मुंबई :लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनलेल्या 'लालबागचा राजा'च्या ( Lalbaugcha Raja ) हुंडीत अर्पण करण्यात आलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या मोजणीस शुक्रवारी सुरुवात करण्यात ( Ornaments Offered to Lalbaugcha Raja will be Auctioned ) आली. तसेच, भाविकांकडून दानपेटीत टाकण्यात आलेल्या पैशांची मोजणीही अद्याप सुरूच असून आतापर्यंत केलेल्या मोजणीत पाच कोटी दोन लाख रुपये भाविकांनी अर्पण केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, ‘राजा’ला अर्पण करण्यात आलेल्या दागिन्यांचा शनिवारपासून चार दिवस लिलाव ( Auctioned for Four Days From Saturday ) करण्यात येणार आहे.
अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ‘लालबागचा राजा’चे विसर्जन झाल्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विश्रांती घेतली. त्यानंतर आज सकाळी दानपेटय़ांमधील पैशांची मोजणी सुरू केली. आजपर्यंतच्या मोजणीत सुमारे पाच कोटी दोन लाख रुपये ‘राजा’ला अर्पण करण्यात ( Five Crore Rupees Offered to Lalbaghcha Raja ) आल्याचे स्पष्ट झाले. आणखी काही दानपेट्या अद्याप मोजावयाच्या असून त्या रविवापर्यंत मोजून पूर्ण होतील, असे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सरचिटणीस सुधीर साळवी यांनी सांगितले.