मुंबई - केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेची कोणतीही भाडेवाढ न करुन प्रवाशांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. मुंबई उपनगरीय मार्गासाठी कोणतीही नवीन घोषणा करण्यात आली नाही. मात्र, मुंबई उपनगरीय मार्गावर घेण्यात आलेल्या प्रलंबित एमयूटीपी ३ ए प्रकल्पाला पूर्ण करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबईकरांसाठी फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पात एमयूटीपी २, ३ आणि ३ ए साठी ५७८ कोटी रुपयांची किरकोळ तरतूद केली होती. यात एमयूटीपी ३ ए साठी फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पात ५० कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र, आता या प्रकल्पांसाठी मुंबईच्या वाट्याला किती कोटी रुपये आले हे १० जुलैला स्पष्ट होणार आहे.