महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

BMC Budget 2022 : मुंबई मनपाचा अर्थसंकल्प सादर; विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची तरतुद - मुंबई महापालिकेचा शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प

मुंबई महापालिकेचा आज (दि. 3 फेब्रुवारी)रोजी (2022-23)या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यामध्ये महापालिकेच्या शिक्षण विभागाचाही अर्थसंकल्प सादर केला आहे. (Provision of digital education) सहआयुक्त अजित कुंभार यांनी शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोषी यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला. (students of BMC In Mumbai ) शिक्षण विभागाचा ३३७०.२४ कोटी रुपयांचा हा असर्थसंकल्प आहे.

BMC Budget 2022
मुंबई मनपा अर्थसंकल्प

By

Published : Feb 3, 2022, 12:42 PM IST

Updated : Feb 3, 2022, 3:03 PM IST

मुंबई - मुंबई महापालिकेचा आज (दि. 3 फेब्रुवारी)रोजी (2022-23)या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यामध्ये महापालिकेच्या शिक्षण विभागाचाही अर्थसंकल्प सादर केला आहे. सहआयुक्त अजित कुंभार यांनी शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोषी यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला. (Provision of digital education to the students) शिक्षण विभागाचा ३३७०.२४ कोटी रुपयांचा हा असर्थसंकल्प आहे. मागील वर्षापेक्षा 424 कोटींनी शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प वाढला आहे. कार्यानुभव शिक्षण ऑनलाइन, टाॅय लायब्ररी, व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण, ई-वाचनालय, डिजिटल क्लासरूम, टॅब पुरवठा, विद्यार्थ्यांच्या आराेग्य साधनांवर सुधारणा असा डिजीटल शिक्षणावर भर देणारा हा अर्थसंकल्प आहे.

मुंबई मनपाचा अर्थसंकल्प सादर; विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची तरतुद

अर्थसंकल्प424कोटींनी वाढला -

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा सन (२०२१- २२)या आर्थिक वर्षांसाठी २९४५.९७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यापेक्षा (२०२२-२३)चा अर्थसंकल्प 424 कोटींनी वाढला आहे. (Mumbai BMC Budget 2022) (२०२१ - २२)च्या अर्थसंकल्पात महसुली उत्पन्न खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज २७०१.७७कोटी एवढे असून (२०२२ -२३)या आर्थिक वर्षाकरिता २८७०. २४ कोटी इतके प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच, २०२१ -२२ या वर्षात भांडवली खर्च २४४.०१ कोटी प्रस्तावाला होती. २०२२-२३ या वर्षासाठी भांडवली खर्च ५०० कोटी रुपये इतका प्रस्तावित करण्यात आला आहे.

यासाठी विशेष तरतूद -

१० वीच्या १९ हजार ४०१ विद्यार्थ्यांना टॅब पुरवठा करण्यासाठी ७ कोटींची तरतूद. शालेय वस्तूंचा मोफत पुरवठा करण्यासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जलशुद्धी यंत्रांचे परिरक्षण करण्यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुलींच्या मुदत ठेवी आणि उपस्थिती भत्यासाठी ५४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी २.३७ कोटी, शाळांत परीक्षेत उत्तीर्ण झालेलया विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी २८ लाख, पॉलिमर डेस्कबेंचसाठी ३.२९ कोटी, पालिका शाळांमधील विद्याथ्यांना मोफत बेस्ट बस सेवेसाठी ४.२५ कोटी, खाजगी शाळांना अनुदान देण्यासाठी ४१४.३२ कोटी, ग्रंथ संग्रहालयांना अनुदान देण्यासाठी १ कोटी, बालवाडी वर्गांना अनुदानासाठी ९.०५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

नवीन योजना व प्रकल्प -

केंब्रिज विद्यापीठाशी संलग्नित आयजीसीएसई व आयबी शिक्षण मंडळाच्या शाळांची उभारणी करण्यासाठी १५ कोटी, कौशल्य विकास पयायोगशाळेसाठी १.४० कोटी, क्रीडा संकुलासाठी ५० लाख, शाळांमध्ये २५ खगोलशास्त्र प्रयोग शाळा स्थापन करण्यासाठी ७५ लाख, अग्निशामक साहित्य आणि उपकरणाची खरेदी करण्यासाठी २.६४ कोटी, शाळांमध्ये बोलक्या संरक्षक भिंतींची निर्मिती करण्यासाठी ५० लाख, वन्यजीव आणि जैवविविधतेच्या माहितीकरिता उपक्रमासाठी ३१ लाख, शिक्षण विभागांच्या उपक्रमांची चित्रफितीद्वारे प्राइस्डही करण्यासाठी १ कोटी, दस्तऐवजांचे संवर्धन करण्यासाठी ४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

शासनाकडून अनुदान -

सन २०२२- २३ मध्ये प्राथमिक शाळांच्या खर्चासाठी ५० टक्के म्हणजेच ४३९.५५ कोटी रुपये राज्य सरकारकडून अपेक्षित असल्याने महसुली उत्पन्नातील ४३५.७८ कोटी इतकी तरतूद प्राथयमिक शिक्षणासाठी शाशनाकडून अनुदान या लेखा शीर्षकाखाली प्रस्तावाला आहे. माध्यमिक शिक्षणासाठी ४९ अनुदानित महापालिका माध्यमिक शालनामधील कार्यरत कर्मचारी वर्गाच्या वेतनासाठी १०० टक्के खर्चाची प्रतिपूर्ती शाशनाकडून केली जाते. याकरिता २०२१ - २२ मध्ये १५८.६२ कोटींची तरतूद प्रतवाली आहे. मागील थकबाकीच्या रकमेपैकी चालू वर्षात १२२.६७ कोटी प्राप्त झाले आहेत.

हेही वाचा -तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतल्याचे प्रकरण, आरोपीला 10 वर्षाची शिक्षा

Last Updated : Feb 3, 2022, 3:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details