महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'कम्युनिटी क्लीनिक'मधील खासगी डॉक्टरांना, पीपीई किटसह विमा संरक्षण द्या - शेवाळे

घरोघरी जाऊन चाचणी करणाऱ्या आणि 'कम्युनिटी क्लीनिक'च्या माध्यमातून काम करणाऱ्या खासगी डॉक्टरांना, पीपीई किट, वैद्यकीय उपकरणे यांच्यासोबतच विमा संरक्षण द्यावे, अशी लेखी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Provide PPE and Life Insurance for private doctors
डॉक्टरांना, पीपीई किटसह विमा संरक्षण द्या

By

Published : Apr 16, 2020, 6:35 PM IST

मुंबई - कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, घरोघरी जाऊन चाचणी करणाऱ्या आणि 'कम्युनिटी क्लिनिक'च्या माध्यमातून काम करणाऱ्या खासगी डॉक्टरांना, पीपीई किट, वैद्यकीय उपकरणे यांच्यासोबतच विमा संरक्षण द्यावे, अशी लेखी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

डॉक्टरांना, पीपीई किटसह विमा संरक्षण द्या

आपल्या पत्रात खासदार शेवाळे यांनी, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची त्वरित अंमलबजावणी राज्य सरकारच्या वतीने करण्यात आल्याबद्दल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. खासदार शेवाळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे, की कोरोना संकटामुळे प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण आहे. या परिस्थितीत राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन मी माझ्या मतदारसंघातील खासगी डॉक्टरांना केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, 'इंडियन मेडिकल कौन्सिल', 'महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल' आणि अनेक स्थानिक डॉक्टर्स संघटनांनी 'कम्युनिटी क्लीनिक'च्या माध्यमातून पालिका प्रशासनाच्या मोहिमेत सहभागी होण्याची तयारी दाखविली. तर अनेक खासगी डॉक्टर्स पालिकेच्या समन्वयातून घरोघरी जाऊन नागरिकांच्या चाचण्या करताहेत.

सामाजिक बांधिलकी जपत हे खासगी डॉक्टर्स पालिकेच्या समन्वयातून, धारावी, अँटॉप हिल्स, चिता कॅम्प, एम पूर्व-पश्चिम, एफ आणि जी प्रभागांमध्ये कार्यरत आहेत. कोरोनाबाबत कार्य करणाऱ्यांना विमा कवच देण्याची घोषणा केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनाही विमा संरक्षण आहे. तथापि, कोरोना युद्धाचा सामना करणाऱ्या खासगी डॉक्टरांनाही विमा संरक्षण द्यावे. विम्याबरोबरच खासगी डॉक्टरांना पीपीई किट आणि वैद्यकीय उपकरणे देण्याची मागणीही खासदार शेवाळे यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details