मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ईडी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आले. अजित पवार यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी गेलेल्या किरीट सोमैया यांच्या विरोधात ईडी कार्यालयाबाहेर ही निदर्शने करण्यात आली आहेत.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ईडी कार्यालयाबाहेर निदर्शने - किरीट सोमैया
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया आज (बुधवारी) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी ईडी (सक्तवसुली संचालनालय) कार्यालयात दाखल झाले. मात्र किरीट सोमैया हे ईडी कार्यालयात दाखल होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमैया यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. याआधीही किरीट सोमैया यांनी काही नेत्यांच्या विरोधात ईडीकडे तक्रार केली होती.
किरीट सोमैया यांच्या विरोधात ईडी कार्यालयाच्या बाहेर निदर्शन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. पोलिसांनी जवळपास 18 ते 20 कार्यकर्त्यांना घोषणाबाजी केल्यामुळे ताब्यात घेतले. मात्र यापुढेही किरीट सोमैया यांना "जवाब दो" म्हणत भारतीय जनता पक्षातील नेत्यांच्या केलेल्या तक्रारीबाबत सोमैया काय करणार? असा प्रश्न सातत्याने विचारला जाईल, असा इशारा कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा -Bhavana Gawli ED case : भावना गवळी आज ईडी कार्यालयात हजर राहणार नाहीत; वकीलाची माहिती