महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मराठा आरक्षण: संकेतस्थळावर प्रवेश निश्चितीची प्रत मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, विद्यार्थ्यांचा पवित्रा - medical students

मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाचा आज पंधरावा दिवस आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा तिढा सोडविण्यासाठी सरकारने जरी अध्यादेश काढला असला, तरी त्याला इतर गटातील विद्यार्थ्यांचा विरोध होईल. यामुळे हा अध्यादेश कोर्टात टिकणार नाही, असे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वाटते.

मराठा आरक्षण: संकेतस्थळावर प्रवेश निश्चितीची प्रत मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, विद्यार्थ्यांचा पवित्रा

By

Published : May 20, 2019, 7:04 PM IST

मुंबई - वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना १६ टक्के आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून राज्य सरकारने अध्यादेश काढला आहे. राज्यपालांनी या अध्यादेशाला संमती देखील दिलेली आहे. मात्र, सिटी कक्षाच्या संकेतस्थळावर प्रवेश निश्चितीचे निर्देश दिले गेले नाही. त्यामुळे संकेतस्थळावर प्रवेश निश्चितीची प्रत मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

मराठा आरक्षण: संकेतस्थळावर प्रवेश निश्चितीची प्रत मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, विद्यार्थ्यांचा पवित्रा

मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाचा आज पंधरावा दिवस आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा तिढा सोडविण्यासाठी सरकारने जरी अध्यादेश काढला असला, तरी त्याला इतर गटातील विद्यार्थ्यांचा विरोध होईल. यामुळे हा अध्यादेश कोर्टात टिकणार नाही, असे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वाटते. त्यामुळे सरकारने तगडी बाजू मांडून हा अध्यादेश कोर्टात संमत करावा, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

राज्यपालांनी या अध्यादेशाला संमती दिली. त्यांच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र, अध्यादेश जोपर्यंत कोर्टात टिकत नाही, तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, असे विद्यार्थी शिवाजी भोसले याने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details