मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांना आदेश दिले आहेत की त्यांनी वारांगणांच्या कामात हस्तक्षेप करू नये. सेक्स वर्क हा 'व्यवसाय' म्हणून लक्षात घेऊन पोलिसांनी स्वमर्जीने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांवर फौजदारी कारवाई करू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर वारांगणांना नेमकं काय वाटतं ? हे जाणून घेण्यासाठी आम्ही काही महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या..
मजबूरी साहेब म्हणून आले -तर आणखी एक वारांगणा म्हणाल्या की, "या व्यवसायात मी माझ्या मर्जीने आले. याच्या आधी मी एका रेती व्यवसायीकाडे काम करत होते. तिथे बरेच पुरुष माझ्याकडे वाईट नजरेने बघायचे. त्यातच नवऱ्याने सोडले होते. त्या पुरुषांच्या घाणेरड्या नजरांची मला भीती वाटायची. मग, विचार केला लोकांच्या नजरा तर काही बदलत नाहीत. मग याच व्यवसायात गेल तर काय वाईट ? त्यातच एका लहान मुलाची जबाबदारी होतीच. मग, या व्यवसायात आले आणि मागची बारा वर्षे मी माझ्या मर्जीने हा व्यवसाय करते. न्यायालयाने आता जो निर्णय दिला आहे तो आमच्यासाठी चांगलाच आहे."
मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे -यासंदर्भात आम्ही अनेक वर्षे वेश्या व्यवसाय करणार्या महिलांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते संजय गुरव यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. ते म्हणाले की, "न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागतच आहे. परंतु, न्यायालयाने कुंटणखान्यात चालवणे हे मात्र बेकायदेशीर म्हटले आहे. इथं वडापाव विकणारे देखील पोट भरण्यासाठी रस्त्यावर गाडी लावतो. तसाच यांना सुद्धा अधिकार आहे. काहीच महिला या व्यवसायात स्वमर्जीने येतात. अनेक वेळा त्यांना विविध आमिष दाखवून किंवा फसवून आणले जाते. बाहेरच्या देशातून येणाऱ्या महिला या काही वेळा स्वमर्जीने येतात. त्यामुळे यात यासाठीसुद्धा काही ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.", असे गुरव यांनी म्हटले आहे.