मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. लसीकरण मोहीम वेगात सुरू राहावी म्हणून प्रत्येक नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये, खासगी सोसायट्या आणि कंपन्यांमध्ये लसीकरण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याठिकाणी राजकीय बॅनरबाजी बंद करावी. तसेच मुंबईच्या हद्दीत बाहेरील केंद्र येऊन लसीकरण करत असल्याचे निदर्शनास आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा मुंबई बाहेरील केंद्रांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिला आहे.
राजकीय बॅनर लावल्यास कारवाई - महापालिका आयुक्त
मुंबईत गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम व्यापक व्हावी म्हणून मुंबईमधील २२७ नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याठिकाणी प्रसिद्धीसाठी संबंधित नगरसेवक आणि त्यांच्या पक्षाकडून बॅनरबाजी केली जाते. त्याचप्रमाणे सोसायट्या आणि लसीकरण केंद्र असलेल्या ठिकाणीही बॅनरबाजी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर उपाय म्हणून लसीकरण केंद्रांवर राजकीय पक्ष आणि नगरसेवकांनी बॅनर लावू नयेत अशा सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने, अखेर पालिका आयुक्तांनी आज परिपत्रक काढून बॅनरबाजी केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.
...तर लसीकरण केंद्राची मान्यता रद्द होणार