मुंबई - राज्यसभेच्या ( Rajya Sabha ) सहा जागांसाठी येत्या 10 जून रोजी मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी ( Election ) राज्यात उलथापालथ सुरू असून अपक्षांचा भाव वधारला आहे. या निवडणुकीत सहाव्या जागेमुळे चुरस निर्माण झाली आहे. या सहा जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सात उमेदवारांची माहिती जाणून घेऊया.
- इम्रान प्रतापगढी, काँग्रेस
इमरान प्रतापगडी हे उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील बेल्हा गावचे रहिवासी आहेत. त्यांचे पूर्ण नाव मोहम्मद इब्रान खान असे आहे. अलाहाबाद विद्यापीठातून त्यांनी हिंदी भाषेतून एमए केले आहे. तर पत्रकारितेचाही डिप्लोमा केला आहे. लहानपणापासून ते कव्वाली आणि शायरी यांचे कार्यक्रम करतात. शायर म्हणून त्यांची ख्याती आहे. यासाठी त्यांनी प्रतापगढी असे नाव धारण केले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मुरादाबाद मतदार संघातून प्रसिद्ध अभिनेते राज बब्बर यांना काँग्रेसचे तिकीट दिले जाणार होते. मात्र, त्यांचे तिकीट कापून राहुल गांधी यांनी हस्तक्षेप करून प्रतापगडींना तिकीट दिले. मात्र, या लोकसभा मतदारसंघात प्रतापगडींचा दारुण पराभव झाला. राजकारणाचा फारसा अनुभव नसलेल्या प्रतापगडी यांना राहुल गांधी यांनी अखिल भारतीय अल्पसंख्याक काँग्रेस सेलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.
- प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी कॉंग्रेस
प्रफुल्ल पटेल यांनी लोकसभा व राज्यसभा अशा संसदेच्या उभय सभागृहांचे सदस्यत्वपद भूषविले आहे. पटेल यांची राज्यसभेची ही चौथी खेप होती. पटेल हे २००० ते २००६ या काळात पूर्ण सहा वर्षे राज्यसभेचे सदस्य होते. २००६ मध्ये त्यांची राज्यसभेवर फेरनिवड झाली. २००९ मध्ये त्यांची लोकसभेवर निवड झाल्याने राज्यसभा सदस्यत्वपद रद्द झाले. २०१४ मध्ये पोटनिवडणुकीत ते पुन्हा राज्यसभेवर निवडून गेले. २०१६ ते २०२२ अशी सहा वर्षे त्यांनी परत खासदारकी भूषविली. आतापर्यंत दोनदा पूर्ण सहा वर्षे तर दोनदा कमी कालावधी त्यांना मिळाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महत्त्वाचे राष्ट्रीय नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 2012 पासून ते अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या भारतीय फुटबॉल प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष आहेत. ते 2017 पासून चार वर्षे फिफा वित्त समितीचे सदस्य राहिले आहेत.
- संजय पवार, शिवसेना
शिवसनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख असलेले संजय पवार हे गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेत सक्रीय आहेत. गेल्या 9 वर्षांपासून ते कोल्हापूर जिल्हाप्रमुख म्हणून सक्रीय आहेत. स्थानिक राजकारणावर त्यांची मजबूत पकड आहे. कोल्हापुरात पक्षबांधणीचे जोमाने काम केले. आण्णासाहेब पाटील महामंडळाचे ते उपाध्यक्ष आहेत. एवढंच नाहीतर, तीन वेळा कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते. शिवसैनिक ते नगरसेवक आणि त्यानंतर जिल्हाप्रमुख असा सेनेतील त्यांचा प्रवास. उच्चशिक्षित आणि संघटन कौशल्य असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये संजय पवार यांच्या नेतृत्त्वाची छाप आहे. तसेच, एक कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळख आहे. यासोबतच, सीमा प्रश्नी आंदोलनताही तब्बल 30 वर्षे संजय पवार सहभागी आहेत.
- संजय राऊत, शिवसेना