मुंबई -इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर फ्रान्समध्ये काढण्यात आलेल्या कार्टूनविरोधात कालपासून मुंबईत वातावरण तापले आहे. यात आज भायखळा, मशीद बंदर या परिसरात पोलिसांच्या चोख बंदोबस्तात मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीचा जुलूस काढण्यात आला.
पोलिसांच्या चोख बंदोबस्तात भायखळा, मशीद बंदर परिसरात जुलूस पोलिसांचा चोख बंदोबस्त -
कोरोना आणि एकूणच पार्श्वभूमी लक्षात घेऊन मुस्लिम समुदायाकडून या जुलूसमध्ये केवळ काही कार्यकर्ते आणि दोन गाड्यांना परवानगी देण्यात आली होती. त्यातूनच मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवसाचा जयघोष करत हा जुलूस भायखळा येथून निघाला होता. यात पुढे आणि मागे पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. या जुलूसमध्ये मोजकेच कार्यकर्ते सहभागी झाले होते. हा जुलूस कुठेही थांबणार नाही, तसेच या दरम्यान कुठेही सोशल डिस्टन्स आणि इतर नियमांचे उल्लंघन होणार नाही यासाठीची खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आली होती.
फ्रान्सविरोधात आंदोलन
फ्रान्समध्ये मोहम्मद पैगंबर यांच्या काढण्यात आलेल्या कार्टूनमुळे काल मुंबई आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात त्याविरोधात आंदोलन केले जात आहेत. त्यात काल मोहम्मद अली रोड, नागपाडा, भेंडी बाजार, जे जे रुग्णालय परिसरात काल फ्रान्सच्या राष्ट्रपतीचे चित्र रस्त्यांवर लावून ती तुडवण्यात आली. तर अनेक ठिकाणी आंदोलने करून निषेध नोंदवण्यात आला. यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये मुंबई पोलिसांकडून कलम 144 लागू करण्यात आला आहे. याच परिसरामध्ये आज काढण्यात आलेल्या जुलूसला पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हेही वाचा -गुजरात दौरा : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आरोग्य वनाचे उद्घाटन
दरवर्षी मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुंबई परिसरातून भायखळा आणि मशीद बंदर या परिसरात लाखो जनसमुदाय जुलूस काढून त्यामध्ये सहभागी होत असतो. यंदा कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन आणि त्यातच फ्रान्समध्ये घडलेल्या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी या परिसरात कलम 144 लागू केले आहे.