मुंबई - ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या शाळांनी आता विद्यार्थ्यांवर ऑफलाइन परीक्षेची सक्ती केल्याचे चित्र समोर आले आहे. राज्य सरकारच्या नियमांना हरताळ फासून काही शाळा विद्यार्थ्यांवर ऑफलाइनची सक्ती करत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे.
पालकांवर जाचक अटी-
राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईतील अनेक शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाइन शाळेला उपस्थित राहणे शक्य नाही अशांसाठी सरकारने ऑनलाइन शिक्षणाची मुभा चालू ठेवावी असे आदेश दिले होते. मात्र, शासनाचे आदेश धुडकावून, काही शाळा विद्यार्थ्यांवर शाळेत उपस्थित राहण्याची सक्ती करत आहेत . विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवल्यानंतर शाळांनी अचानक ऑफलाइन परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. ज्यात पालकांना शाळेत उपस्थित राहणे शक्य नाही असे सांगत ऑनलाइन परीक्षेचा आग्रह धरला आहे. तसेच अशा पालकांवर जाचक अटी लागल्याचे समोर आले आहे.