महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 12, 2022, 8:19 PM IST

Updated : Sep 12, 2022, 9:02 PM IST

ETV Bharat / city

नवरात्रीत गुप्तहेरांच्या मागणीत अचानक वाढ, भारताच्या पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांच्याकडून जाणून घ्या कारण

नवरात्र उत्सवादरम्यान यंदा गुप्तहेरगिरीचा धंदा तेजीत Spy Business booms in Navratri 2022 असल्याचे दिसत आहे. गेले दोन वर्षे कोरोनाचे सावट असल्यामुळे नवरात्रीत होणारा दांडिया मोठ्या प्रमाणावर साजरा होऊ शकला नव्हता. मात्र, यंदा दांडिया निमित्त बाहेर पडणारे कपल्स, तरुण-तरुणी आणि पती पत्नी त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी खासगी गुप्तहेर Private detective watch Navratri यांना पसंती मिळत असल्याचे दिसत आहे. hiring private detectives to spy

गुप्तहेरगिरीचा धंदा तेजीत
गुप्तहेरगिरीचा धंदा तेजीत

मुंबई :नवरात्र उत्सवादरम्यान यंदा गुप्तहेरगिरीचा धंदा तेजीत Spy Business booms in Navratri 2022 असल्याचे दिसत आहे. गेले दोन वर्षे कोरोनाचे सावट असल्यामुळे नवरात्रीत होणारा दांडिया मोठ्या प्रमाणावर साजरा होऊ शकला नव्हता. मात्र, यंदा दांडिया निमित्त बाहेर पडणारे कपल्स, तरुण-तरुणी आणि पती पत्नी त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी खासगी गुप्तहेर Private detective watch Navratri यांना पसंती मिळत असल्याचे दिसत आहे. hiring private detectives to spy

दांडिया महोेत्सवादरम्यान गुप्तहेरांकडून केल्या जाणाऱ्या हेरगिरीविषयी माहिती देताना रजनी पंडित

हेरगिरीच्या व्यवसायाला सुगीचे दिवस -दरवर्षी नवरात्री उत्सवा दरम्यान खासगी गुप्तहेर Navratri is boom for private detectives आणि पालक आपल्या मुला मुलींवर किंवा एखादी पती-पत्नी एकमेकांविषयी संशय वाटत असल्यास त्याच्यावर वॉच ठेवण्यासाठी खाजगी गुप्तहेर यांना सांगतात. याबाबत ईटीव्ही भारतशी बोलताना भारतातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गेले दोन वर्षे कोरोना या आजारामुळे काम बंदच होते. मात्र यंदा कोरोनाचे निर्बंध उठवल्यानंतर सगळेच सण मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत यंदा नवरात्र उत्सवा दरम्यान आतापासूनच मोठ्या प्रमाणावर काम येण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन-तीन दिवसात दहा कामे आली असून येत्या काही दिवसात सुद्धा अनेक कामे येण्याची शक्यता आहे.

मेट्रोसिटीमध्ये गुप्तहेरीचा व्यवसाय तेजीत- रजनी पंडित यांनी सांगितले की, नवरात्र उत्सवात रात्री अपरात्री दांडीयाच्या नावाखाली अनेक तरुण-तरुणी आपल्या पालकांना दांडियाचे कारण सांगून घराबाहेर पडतात. तसेच अनेक पती-पत्नी देखील दांडियाच्या नावाखाली रात्रभर बाहेर असतात. त्यावेळी पालकांच्या अथवा पती-पत्नीच्या मनात संशयाची पाल चुकचुकली की, त्या आमच्याकडे येतात आणि आम्हाला त्या त्या व्यक्तीवर पाळत ठेवण्यास सांगतात. आमचे गुप्तहेर वेशांतर करून दांडियाच्या घोळक्यात कधी कधी सामील होतात तर पाठलाग करून ते कुठल्या हॉटेलवर जातात का अथवा कुठल्या निर्जन स्थळी जातात का? याची माहिती घेऊन देतात. मुंबईसह सुरत, अहमदाबाद येथील बरेच काम सध्या माझ्याकडे आलेले असून मुंबईतील काम असेल तर 50 ते 60 हजार आकारले जातात. तर मुंबई बाहेरील असेल तर त्या त्या परिस्थितीनुसार आणि किती दिवसांचे काम आहे. त्यावर आम्ही शुल्क आकारतो आतापर्यंत आलेले काम हे काहींनी दोन दिवस पाठ ठेवण्यासाठी दिले तर काहींनी नऊ दिवस पाळत ठेवण्यासाठी दिलेले आहे.

पालकांची गुप्तहेरांकडून मुलांवर नजर -यामध्ये तरुण तरुणी त्याचप्रमाणे विवाहित महिला, पुरुष यांचे देखील मोठ्या प्रमाणावर संख्या असल्याचे रजनी पंडित यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पालक आपल्या मुलीवर कोणताही अतिप्रसंग अथवा वाईट कृत्य आपल्या मुलीसोबत होऊ नये, म्हणून आमच्याकडे धाव घेतात आणि सुटकेचा विश्वास सोडतात. गेल्या अनेक वर्षे मी काम करत असल्याने लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे मुंबई बाहेरील देखील अनेक लोक माझ्याकडे गुप्तहेरगिरी करण्याचे काम सोपवतात.

Last Updated : Sep 12, 2022, 9:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details