महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

School Starts From Today : राज्यात आजपासून प्राथमिक व माध्यमिक शाळा होणार सुरू, शाळांमध्ये होणार प्रवेशोत्सव साजरा - School Starts From Today

आजपासून राज्यातील शाळा सुरू होत असून अनेक बालकांचे ‘पहिले पाऊल’ औपचारिक ( Schools starts in MH ) शिक्षण प्रवाहात पडणार आहे. हे पाऊल जितके दमदार, आनंदी, उत्साही आणि कृतीयुक्त पडेल तितकी शालेय शिक्षणाची अभिरूची वृद्धींगत होणार आहे. या अनुषंगाने कोरोनाच्या नकारात्मक कालावधीला मागे सारून शालेय शिक्षण विभागाने बालकांसाठी ( MH gov initiative for school reopen ) विविध उपक्रम राबविले आहेत.

Schools Starts from today
शाळेचा पहिला दिवस

By

Published : Jun 15, 2022, 8:10 AM IST

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे कमी झाल्यामुळे जवळपास अडीच वर्षानंतर ऑफलाईन शाळा ( offline schools from today ) आजपासून सुरू होणार आहेत. अडीच वर्षानंतर शाळेची घंटा वाजणार ( schools first day ) असल्याने विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले ( MH schools opening ) आहे. 15 जून पासून प्रत्यक्षात सर्व विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात ( gov directions for schools ) आल्या आहेत.

गेली अडीच वर्ष ऑनलाइन शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात होते. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान कडक लॉकडाउनचे निर्णय राज्य सरकारने घेतले होते. या सर्वांचा विद्यार्थी वर्गावर मोठा परिणाम झाला होता.


विद्यार्थी पालकांना शिक्षण मंत्र्यांचे आवाहन-आजपासून राज्यातील शाळा सुरू होत असून अनेक बालकांचे ‘पहिले पाऊल’ औपचारिक ( Schools starts in MH ) शिक्षण प्रवाहात पडणार आहे. हे पाऊल जितके दमदार, आनंदी, उत्साही आणि कृतीयुक्त पडेल तितकी शालेय शिक्षणाची अभिरूची वृद्धींगत होणार आहे. या अनुषंगाने कोरोनाच्या नकारात्मक कालावधीला मागे सारून शालेय शिक्षण विभागाने बालकांसाठी ( MH gov initiative for school reopen ) विविध उपक्रम राबविले आहेत. चला आपण सर्व मिळून या बालकांचा प्रवेशोत्सव साजरा करू या, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे. कोरोनाच्या विपरित परिणामांना शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही. तथापि, राज्याच्या शिक्षण विभागाने मुलांचे शिक्षण सुरू ठेवले.

शाळापूर्व तयारी अभियानाचे राज्यात सर्वत्र आयोजन-बालक शिक्षणापासून दूर जाऊ नयेत याकरीता सेतू अभ्यासक्रम, ऑनलाइन अध्ययन, शिकू आनंदे, टिलीमीली, गोष्टींचा शनिवार, स्वाध्याय, दैनिक अभ्यासमाला, समाज माध्यमातून शिक्षण, जिओ चॅनलच्याद्वारे कोविड 19 च्या परिस्थितीत शिक्षण सुरू ठेवले. आता शाळा सुरू झाल्या आहेत. या परिस्थितीत शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील बालकांच्या विकासात महत्वाची भूमिका बजविणाऱ्या ‘पहिले पाऊल’ या शाळापूर्व तयारी अभियानाचे राज्यात सर्वत्र आयोजन करण्यात आले आहे. शाळा सुरू झाल्यानंतर दुसरा मेळावा आयोजित केला जाणार आहे. त्यात पहिल्या मेळाव्यानंतरच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे.



82 हजारांहून अधिक शाळांना पुस्तके वितरीत-राज्यातील पहिले ते आठवी पर्यंतच्या अनुदानित शाळांमधून विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात आली आहेत. याअंतर्गत 82 हजारांहून अधिक शाळांमधून पाच कोटी 38 लाखांहून अधिक पुस्तके वितरीत करण्यात आली आहेत. जिल्हा परिषदेच्या पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी दोन गणवेश खरेदी करण्यात आले आहेत. याचबरोबर नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी नजीकच्या दगडखाणी, वीटभट्टी, बाजारपेठा, पदपथ, कामगारवस्त्या अशा ठिकाणी सर्वेक्षण करून शाळेच्या परिसरातील 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याची खात्री केली जाणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

शाळेतील वातावरण चैतन्यमय करावे-इयत्ता पहिली ते बारावी मधील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करताना ( School Entrance ceremony) शाळा प्रवेशाच्या पहिल्या दिवशी (the first day of school) प्रत्येक अधिकाऱ्याने किमान एका शाळेत जाऊन विद्यार्थी आणि शिक्षकांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रबोधन करावे. फूल देऊन किंवा शालेय उपयोगी साहित्य देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात यावे. विद्यार्थ्यांमध्ये शाळेत उपस्थित राहण्याची आवड निर्माण होण्यासाठी शाळेतील वातावरण चैतन्यमय आणि उत्साहवर्धक राहील असे व्यवस्थापन करावे, असे परिपत्रक सर्व संबंधितांना देण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळात विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित नसल्याने शैक्षणिक अध्ययन विस्कळीत झाले आहे. शाळांतील शैक्षणिक सोयीसुविधा अस्त-व्यस्त झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार-पार्श्वभूमीवर पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभावी आणि दर्जेदार तसेच उत्सुकतेने होणे अपेक्षित असल्याने हा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. मागील काळात विद्यार्थ्यांना त्यांच्या किमान पातळीपर्यंत आणण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षक यांच्याशी चर्चा करून अध्ययन निष्पत्तीसाठी उपाययोजना, सेतू अभ्यासक्रम, इतर शैक्षणिक साधनांची प्रभावी अंमबजावणी करण्याबाबत सहकार्य करावे. तसेच शाळा प्रवेशाच्या दिवशी माजी विद्यार्थी, माजी शिक्षक, स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ यांचे सहकार्य घेण्यात यावे, असेही याद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुलांच्या लक्षणांवर संस्था चालकांनी लक्ष ठेवावे-येत्या 15 जून पासून राज्यभरातल्या शाळा या सुरू आहेत. शाळेत मुलांच्या लक्षणांवर संस्था चालकांनी लक्ष ठेवावे, अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. ते जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत कोणतीही गोष्ट आडवी येणार नाही. मात्र, शाळेत येणाऱ्या या मुलांच्या कोरोनाच्या लक्षणांवर संस्था चालकांनी लक्ष ठेवावे. त्याचबरोबर राज्यात सध्या 15 हजार कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत. पण, रुग्णालयांमध्ये गर्दी नाहीये. हे सगळं लस घेतल्यामुळे झाले आहे. तरी ज्या लोकांनी अद्याप दुसरा डोस घेतलेला नाही आहे. त्या लोकांनी दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन देखील यावेळी राजेश टोपे यांनी केलं आहे.

शालेय साहित्यांमध्ये दरवाढ-कोरोनामुळे दोन वर्षे दप्तर, पाटी, पुस्तक, गणवेश व अन्य साहित्याची विक्री झाली नाही. इंधन दरवाढ, मजुरी वाढ,वाहतूक खर्च, पेपरच्या वाढलेल्या किंमतीमुळे शैक्षणिक साहित्य महागले आहे. वह्यांच्या किंमतीत मागील दोन वर्षांच्या तुलनेत अधिक आहे. गेल्या वर्षी 300 रुपये डझन असणाऱ्या वह्या आता 400 ते 450 रुपयांवर गेल्या आहेत. तसेच पाच रुपयांना मिळणारा साधा पेन आता सात रुपयांना मिळत आहेत. दुसरीकडे पालक जुन्या दराप्रमाणे मागणी करत असल्याचे शालेय साहित्य विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

13 जूनपासून शैक्षणिक वर्ष-राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णयानुसार येत्या 13 जून पासून (दुसरा सोमवार) शैक्षणिक वर्ष सुरू होणार ( School Open on 13 June ) आहे. तर, 15 जूनपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना द्या, असे निर्देश शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना दिले आहेत.

हेही वाचा-Kolhapur Rajaram High School : कोल्हापूरात जिल्हा परिषद शाळा वाचविण्यासाठी भोंगा, संभाजी ब्रिगेडची अनोखी धडपड
हेही वाचा-Palghar Zilla Parishad School : 'ईटिव्ही भारत'च्या वृत्तानंतर चिंचणीतील शाळेचे बांधकाम नव्याने सुरू

हेही वाचा-NO Road To Go To School : शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्याने दाखला काढून घेतला

ABOUT THE AUTHOR

...view details