पुणे/ठाणे/नवी मुंबई - कायम मागे-पुढे होणारा पाऊस. तसेच, आला तर पुर्णपणे नासाडी करणारा पाऊस. या चक्रामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामध्येच इंधनाची गगनाला भिडलेली वाढ, नुकताच गणेशोत्सव झाला, काही ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव अधिकचेच वाढले आहेत. सध्या कोबी वगळता बटाटा, कांदा यासह सर्वच भाजीपाल्याचे भाव कमालीचे वाढले आहेत.
१० ते २० रुपयांनी मिळत असलेल्या भाज्यांचा दर झाला २० ते ३० रुपये प्रतिकिलो
राज्यात काही ठिकणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे झालेले नुकसान हे मोठे आहे. तेथे कोणतेच उत्पादन नाही. तसेच, जे उत्पादन घेतले होते ते पुर्णत: वाया गेलेले आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झालेली आहे. त्यामुळे भाजीपाल्याची बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. बाजारात रोजच्या प्रमाणात ज्या गाड्या येतात त्याच्या अर्ध्याच गाड्या बाजारात येत आहेत. आधी प्रतिकिलो १० ते २० रुपयांनी मिळत असलेल्या भाज्या आता २० ते ३० रुपये प्रतिकिलो दर झाला आहे. घाऊक बाजारात वाढ झाल्याने या सर्व भाज्या किरकोळीत दुप्पट ते तिप्पट दराने विकल्या जात आहेत. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खचार्त वाढ झाल्याने ही दरवाढ झाली असल्याचे काही विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
काय आहेत भाव
- मेथी जुडी 50,
- कोथिंबीरी जुडी 40,
- आळु जुडी 25,
- गवार 150 रु किलो,
- भेंडी 70 रु किलो,
- डांगर 50 रु किलो,
- कारले 50 रु किलो,
- चौळी 65 रु किलो,
- टोमॅटो 25 रु किलो,
- बटाटे 20 रु किलो,
- घेवडा 50 रु किलो,
- वांगी 60 रु किलो,