महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Presidential Election 2022 : राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान; महाराष्ट्रातून मिशन 200 - महाराष्ट्रातून द्रौपदी मुर्मूंना होणार भरघोस मतदान

देशाच्या राजकारणातील सर्वोच्च पदासाठी ( Voting For Highest Post in Country ) आज मतदान होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ( Presidential Election 2022 ) भाजपनंकडून द्रौपदी मुर्मू यांच्या रुपात आदिवासी चेहरा दिला आहे. तर विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातून द्रौपदी मुर्मूंना 200 आमदार मतदान करतील ( CM Eknath Shinde told 200 MLAs Vote to Murmu ) हे शिंदे सरकारने अगोदरच जाहीर केले आहे. त्यामुळे आता शिंदे सरकारला आणखी मतदारांची जुळवाजुळव करावी लागणार हे निश्चित. ( ( Draupadi Murm Getu 60 Percent Votes )

Voting today for Presidency
राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान

By

Published : Jul 18, 2022, 9:47 AM IST

Updated : Jul 18, 2022, 1:47 PM IST

मुंबई :देशातील सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक ( Presidential Election 2022 ) होत आहे. ( Voting For Highest Post in Country ) सत्ताधारी एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू आणि विरोधकांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात थेट लढत होणार आहे. तरीसुद्धा द्रौपदी मुर्मू यांना 60 टक्क्यांहून अधिक मते ( Draupadi Murmu Getu 60 Percent Votes ) मिळवून देण्याची सत्ताधारी भाजपची रणनीती असल्याचे समजते. त्यातच महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मतदान होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

देशाचे 15 व्या राष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा आमनेसामने आहेत. भारताचे १५ वे राष्ट्रपती निवडण्यासाठी ४,००० हून अधिक सदस्य आज मतदान करणार आहेत. झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांना अनेक प्रादेशिक पक्षांनी पाठिंबा दिल्याने, विजयासाठीची अपेक्षित संख्या स्पष्टपणे एनडीएच्या उमेदवाराच्या बाजूने आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचेही आमदार फोडण्याचे प्रयत्न : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांतील ७७६ खासदार आणि देशभरातील सर्व विधानसभांचे ४०३३ आमदार असे एकूण ४८०९ आमदार आज मतदान करणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून २८७ आमदार आणि ४८ खासदार मतदान करणार आहेत. मात्र, तुरुंगात असलेले आमदार अनिल देशमुख आणि आमदार नवाब मलिक या राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना अद्याप मतदानाची परवानगी भेटली नसल्याने २८५ आमदार मतदान करतील. सध्या भाजप आणि शिंदे गटाचे मिळून एकूण १६५ आमदार आहेत. तर शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांचे १५ अशी एकूण ही संख्या १८० पर्यंत पोहोचली आहे.

शिंदे सरकारने केली होती घोषणा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना २०० आमदारांचा टप्पा गाठण्यासाठी आणखी २० आमदारांची गरज लागणार आहे. अशात त्यांनी द्रौपदी मुर्मू यांना राज्यातून २०० आमदार मतदान करतील, हे यापूर्वीच सांगितले असल्याकारणाने आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे २० आमदार फोडण्याचे प्रयत्न शिंदे गटाकडून केले जाऊ शकतात. त्यातच भाजपचीही त्यांना साथ लाभणार आहे. अशात २०० आमदारांनी द्रौपदी मुर्मू यांना मतदान केल्याने त्यांचे राज्यातील आमदारांचे मतमूल्य ३५ हजार इतके होणार आहे.


द्रौपदी मुर्मू यांच्याकडे 60% हून अधिक मते :देशातील आमदार, खासदार यांच्या मतांचे एकूण मूल्य १०,८६,४३१ इतके आहे. तर विजयासाठी द्रौपदी मुर्मू यांना ५,४३,२१६ अधिक इतके मत मूल्य हवे आहे. सत्ताधारी एनडीएकडे एकूण ४४८ खासदार आणि १७७३ आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या मतांचे मूल्य ५,३२,१३९ एवढे असून द्रौपदी मुर्मू यांना विजयासाठी फक्त ११,०७७ मतांची आवश्यकता असून एमआयडीएमके, ओडिशातील सत्ताधारी बीजू जनता दल आणि आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेसने त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

देशभरातून अनेक पक्षांनी दिला द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा : देशभरातील अनेक छोट्या-मोठ्या पक्षांनी द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देण्याचे जाहीर केल्याने त्यांना होणारे मतदान अपेक्षेपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. झारखंड मुक्ती मोर्चा आणि शिवसेनेने ही द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच तेलगू देशम पक्ष, बहुजन समाज पक्ष, धर्मनिरपेक्ष जनता दल, शिरोमणी अकाली दलाने तसेच उत्तर प्रदेशातील सुहेलदेव पक्षाने दिलेल्या पाठिंब्यानंतर द्रुपदी मुर्मू यांच्याकडील मते ६० टक्क्यांहून अधिक होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या विजय सुकर झाला आहे.





हेही वाचा :Sanjay Raut : एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे भेटणार का? संजय राऊत यांनी हे दिले संकेत

Last Updated : Jul 18, 2022, 1:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details