मुंबई -देशातील सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत असून महाराष्ट्रातून एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना रेकॉर्ड ब्रेक मत भेटतील, असा विश्वास भाजप नेते, माजी मंत्री आशिष शेलार ( Ashish Shelar ) यांनी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP ) आणि मित्र पक्षांची मत ही विरोधकांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांना भेटतील असा विश्वास काँग्रेस नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.
ही लढाई जाती-धर्माची नसून विचाराची आहे, थोरात -याप्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, आमचं एकही मत फुटणार नाही. काँग्रेसची 44 सर्व मतं त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांचीही मतं आमचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना भेटतील. मध्यंतरी विधान परिषदेमध्ये काँग्रेसची मतं फुटली होती. परंतु, यंदा तसे होणार नाही. ही लढाई जाती धर्माची आहे, असो मी मानत नसून, लोकशाही मोडायला भाजप निघालेला आहे. म्हणून ही लढाई विचारायची आहे. जाती- धर्माची नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर 20 जुलैला शिवसेनेच्या अपात्र आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. यावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्यघटना व पक्षांतर बंदीचा विचार केला, तर आम्हाला न्याय भेटेल अशी आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षा आहे, असे यावेळी सांगितले आहे.