मुंबई - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट ( Sachin Tendulkar Meet Ramnath Kovind ) घेतली आहे. त्यांची ही भेट मुंबईमधील राजभवनात झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद चार दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर ( President Ramnath Kovind Maharashtra Tour ) आहेत. आज राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते राजभवनातील दरबार हॉलचे लोकार्पण झाले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद गुरुवारी मुंबईला पोहोचले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Governor Bhagtisngh Koshyari ) आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री आदित्य ठाकरे ( Minister Aditya Thackeray ) यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते आज शुक्रवारी ११ फेब्रुवारीला राजभवनात बांधण्यात आलेल्या नवीन दरबार हॉलचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती कोविंद यांनी सचिन तेंडूलकर याची भेट घेतली. याबाबतचे फोटो राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट केले आहे.