मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ( Param Bir Singh ) यांच्या निलंबनाची राज्य सरकारकडून तयारी सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे. खंडणी प्रकरणी परमबीर सिंह यांच्या खटला सुरू आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांच्यावर देखील त्यांनी गंभीर आरोप केले आहे. या आरोपावरून सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई होत आहे. निलंबनाच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्याची माहिती आहे.
Param Bir Singh Case : परमबीर सिंह यांच्या निलंबनाची राज्य सरकारकडून तयारी - खंडणी प्रकरण
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ( Maharashtra Govt Param Bir Singh Suspension ) यांच्या निलंबनाची राज्य सरकारकडून तयारी सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे. खंडणी प्रकरणी ( Param Bir in 100 cr extortion case ) परमबीर सिंह यांच्या खटला सुरू आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh 100 cr extortion case ) यांच्यावर देखील त्यांनी गंभीर आरोप केले आहे.
कोट्यावधी रुपयांच्या कथीत खंडणी वसुलीप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यासह तब्बल 29 आरोपींवर ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. मात्र, न्यायालयात आरोपपत्र सादर न केल्याच्या कारणास्तव आरोपींनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. जामीन अर्जावर ठाणे न्यायालयात मंजुरीचे शिक्कामोर्तब करण्यात आले. या दोन्ही आरोपींना जामीन मंजूर झाल्याने सरकारी वकील आणि फिर्यादी यांचे वकील यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.