महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Navratri festival 2022 : गणेशोत्सव संपला, मुंबईकरांना लागले नवरात्रीचे वेध - Rangratri Dandiya Nights Bhumi Pujan by Sunil Rane

गणेशोत्सव संपला आणि लोकांना नवरात्रीचे वेध सुद्धा लागलेत. नुकतेच रंगरात्री दांडिया नाईट्सचे ( Rangratri Dandiya Nights ) भूमिपूजन सुनील राणे यांच्या हस्ते संपन्नसुद्धा झाले. गुजरातमधील लोकप्रिय गायिका किंजल दवे ( Gujarats popular singer Kinjal Dave ) बोरिवली पश्चिम येथे होणाऱ्या 'रंगरात्री दांडिया नाईट्स' ( Rangratri Dandiya Nights ) मध्ये परफॉर्म करणार आहेत. रंगरात्री दांडिया नाइट्सच्या प्रमोशनसाठी, किंजल दवे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबईतील विविध ठिकाणी गरबा प्रेमींना भेटण्यासाठी सिटी टूर देखील करणार आहे. महत्वाचं म्हणजे या महोत्सवात अनेक सेलिब्रिटीज हजेरी लावणार आहेत.

Rangratri Dandiya Nights Bhoomipujan
रंगरात्री दांडिया नाईट्स चे भूमिपूजन

By

Published : Sep 11, 2022, 5:30 PM IST

बोरिवली :नुकताच गणेशोत्सव संपला आणि लोकांना नवरात्रीचे वेध सुद्धा लागलेत. आता हेच बघाना, नुकतेच रंगरात्री दांडिया नाईट्सचे भूमिपूजन सुनील राणे यांच्या हस्ते ( Rangratri Dandiya Nights Bhumi Pujan by Sunil Rane ) झाले. गुजरातमधील लोकप्रिय गायिका किंजल दवे ( Gujarats popular singer Kinjal Dave ) बोरिवली पश्चिम येथे होणाऱ्या रंगरात्री दांडिया नाईट्समध्ये ( Rangratri Dandiya Nights ) परफॉर्म करणार आहेत. रंगरात्री दांडिया नाइट्सच्या प्रमोशनसाठी, किंजल दवे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबईतील विविध ठिकाणी गरबा प्रेमींना भेटण्यासाठी सिटी टूरदेखील करणार आहे. महत्वाचं म्हणजे या महोत्सवात अनेक सेलिब्रिटीज हजेरी लावणार आहेत.

कसे असणार रंगरात्री दांडिया नाईट्स : दुर्गादेवी नवरात्र उत्सव समिती बोरिवली आणि सुनील राणे यांच्यातर्फे प्रीमियम कच्छी मैदान, बोरिवली पश्चिम येथे आयोजित करण्यात येणाऱ्या आगामी 'रंगरात्री दांडिया नाईट्स' चा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला. भूमिपूजनाच्या या कार्यक्रमाला सुनील राणे, आमदार बोरिवली, वर्षा राणे यांच्यासह स्थानिक संयोजक उपस्थित होते. यावेळी 'रंगरात्री दांडिया नाईट्स' चे आयोजक सुनील राणे म्हणाले की, गरबा नाईट्स मुंबईकरांना नेहमीच उत्साही ठेवतात. बोरिवलीतील नवरात्रीच्या सेलिब्रेशनला एक वेगळाच रंग आला आहे आणि यंदा 'रंगरात्री दांडिया नाइट्स' मध्ये किंजल दवेची गाणी आणि संगीतही जोरात असणार आहे.

किंजल दवे सादरीकरण करण्यास उत्साहित : या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना सुनील राणे म्हणाले, 'नवरात्र हा एक अतिशय शुभ सोहळा आहे आणि हा उत्सव एखाद्या जल्लोषापेक्षा कमी नसावा. हा सण सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणतो आणि प्रत्येकाला उत्सवाच्या देवत्वात मग्न झालेले पाहणे खूप आनंददायी आहे!' किंजल दवेने शेअर केले की, मुंबईमध्ये परफॉर्म करणे, विशेषत: नवरात्रीदरम्यान, मी नेहमीच आतुरतेने वाट पाहत असते. ‘रंगरात्री दांडिया नाइट्स’ मध्ये सादरीकरण करण्यास मी खूप उत्साहित आहे आणि सुनील राणे आणि त्यांच्या टीमसोबत माझ्या मुंबई संगीतमय प्रवासाची सुरुवात करण्याचा मला सन्मान आहे. आम्ही 9 दिवसांचा एक अविस्मरणीय उत्सव तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मला खरोखर आशा आहे की मुंबईकर आम्हाला त्यांचे प्रेम आणि समर्थन देतील. रंगरात्री दांडिया नाईट्स सेलिब्रेशनसाठी गरबाप्रेमी बोरिवलीत सज्ज झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details