महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

स्वातंत्र्य दिनानिमित्त 'या' नव्या विक्रमाची तयारी; लिम्का बुक रेकॉर्डमध्ये होणार नोंद - mumbai

15 ऑगस्ट निमित्त एक वेगळा उपक्रम पिडीलाईट इंडस्ट्रीजच्या फेविक्रिल या कला आणि हस्तकला क्षेत्रातील आघाडीच्या ब्रॅण्डतर्फे राबवण्यात येत आहे. या उपक्रमात 30 फूट मोठा भारताचा नकाशा तयार करण्यात येणार आहे.

उपक्रम

By

Published : Aug 2, 2019, 7:56 AM IST

मुंबई- 15 ऑगस्ट निमित्त एक वेगळा उपक्रम पिडीलाईट इंडस्ट्रीजच्या फेविक्रिल या कला आणि हस्तकला क्षेत्रातील आघाडीच्या ब्रॅण्डतर्फे राबवण्यात येत आहे. ऑल कॅन आर्ट असे या उपक्रमाचे नाव आहे. या उपक्रमात 30 फूट मोठा भारताचा नकाशा तयार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी, आजारग्रस्त, कर्मचारी यांच्या मदतीने हा नकाशा बनवण्यात येणार आहे. पार्कीन्सन या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांनीही यात भाग घेतला आहे. हा नकाशा तीन टप्प्यात तयार करण्यात येणार आहे. तसेच या उपक्रमाची लिम्का बुक रेकॉर्डमध्ये नोंद ही करण्यात येणार आहे.

15 ऑगस्ट निमित्त उपक्रम

'फ्लुइड आर्ट टेक्निक’चा वापर करत सूंदर चित्र रेखाटता येऊ शकते. परिपूर्णतेच्या कल्पनांच्या पलीकडे प्रत्येकाला कलेसाठी प्रोत्साहित करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. सर्वसाधारणपणे रंग व चित्रकला यांच्याविषयी माहिती नसलेले कॅनव्हासवर आपली कल्पना मांडण्यास टाळाटाळ करतात. परंतु ‘फ्लुइड आर्ट’मुळे लोकांना मुक्तपणे पेंटिंग करण्याची संधी मिळणार आहे, असे आयोजकांनी सांगितले.

पार्कीन्सनच्या 60 हून अधिक रुग्णांनी ‘फेव्हिक्रील’च्या कार्यशाळेत भाग घेतला. ‘फ्लुइड आर्ट’ तंत्राचा वापर करून त्यांनी कॅनव्हासवर रंग भरला. शारिरीक समस्यांना सामोरे जाण्याचे आव्हान असूनही, या विशिष्ट कला प्रकारामुळे या रुग्णांना त्यांच्यात असलेली कला समोर आणण्याची संधी मिळाली.

त्यानंतर 11 ऑगस्ट रोजी ‘सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉल’मध्ये भारताचा सर्वात मोठा नकाशा तयार करण्यासाठी या सर्व कलाकृती एकत्र ठेवल्या जातील. त्यांचे अनावरण 11 ऑगस्ट रोजी होऊन स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details