मुंबई - लोकमान्य टिळक टर्मिनस येथे रेल्वे प्रवाशांच्या सोई करिता प्रथमच प्री-पेड ऑट रिक्षा स्टँड शनिवारपासून सुरू करण्यात आले. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते या प्री-पेड रिक्षा स्टँडचे उदघाटन करण्यात आले. यावेळी परब यांनी उपनगरात प्रीपेड रिक्षा स्टँड वाढवणार असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा... शादी डॉटकॉमवर महिलेची फसवणूक; अमरावतीच्या महिलेला २६ लाखांचा चुना
कुर्ला रेल्वे स्थानक जवळील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून दररोज हजारो रेल्वेने मुंबईत ये-जा करत असतात. परंतु गेल्या काही दिवसात या प्रवाशांच्या लुटीच्या आणि असुरक्षिततेचा घटना समोर येत आहेत. त्यामुळे, अशा प्रसंगी प्री-पेड ऑटो रिक्षा स्टँड प्रवाशांना सुरक्षित आणि योग्य दरात रिक्षा सेवा पुरवणारआहे. मुंबईतील हा प्रथमच प्रीपेड स्टँड असून यापुढे शहरात असे अनेक ठिकाणी प्रीपेड रिक्षा स्टँड उभे करणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले.