महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

स्तनदा माता व गरोदर महिलांचे 'वॉक इन' पद्धतीने लसीकरण केले जाणार - pregnant women vaccination

गरोदर महिला आणि स्तनदा मातांनाही कोविड-१९ म्हणजेच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, मुंबईतील शासकीय व महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर वॉक इन पद्धतीने लस देण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

pregnant women will be vaccinated on a walk-in basis in mumbai
गरोदर माता

By

Published : May 25, 2021, 8:19 AM IST

मुंबई- केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने १९ मे २०२१ रोजी केलेल्या सुचनांनुसार, गरोदर महिला आणि स्तनदा मातांनाही कोविड-१९ म्हणजेच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, मुंबईतील शासकीय व महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर वॉक इन पद्धतीने लस देण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

स्तनदा मातांना लस -

स्तनदा मातांना लस देताना योग्य त्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये प्रसुती झाल्याचा दिनांक, स्थळ यांसह आवश्यक वैद्यकीय कागदपत्रं तसेच वैद्यकीय माहिती समवेत बाळगणे आवश्यक आहे. आठवड्याचे पहिले तीन दिवस म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार या तीन दिवशी वॉक इन येणाऱ्या विविध पात्र नागरिकांना लसीकरण करण्यात येते. त्यामध्ये आता स्तनदा मातांनाही समाविष्ट करण्यात आले आहे. स्तनदा मातांचे लसीकरण केंद्रामध्ये जागेवरच नोंदणी करुन लागलीच त्यांना लस देण्यात येईल.

गरोदर स्त्रियांना लस घेता येणार-

गरोदर स्त्रियांना जर कोविड प्रतिबंधक लस घेण्याची इच्छा असेल, तर अशा गरोदर स्त्रियांना, त्यांच्यावर उपचार करीत असलेल्या स्त्री रोग तज्ज्ञाने त्यांच्या लेटरहेड, कोविड लस देण्याबाबत तसे लेखी प्रमाणपत्र देणे आवश्यक असेल. असे प्रमाणपत्र गरोदर स्त्रियांनी स्वतः स्त्री रोग तज्ज्ञाकडून प्राप्त केल्यानंतर कोविड लस घेण्याबाबत स्वतःचे संमतीपत्र देखील द्यावे लागेल. स्त्री रोग तज्ज्ञाचे प्रमाणपत्र आणि संमतीपत्र अशी दोन्ही कागदपत्रं लसीकरण केंद्रावर येताना सोबत आणावी आणि लसीकरण केंद्राकडे सुपूर्द करावी. त्यानुसार, त्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असे पालिकेने कळविले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details