विरोधी पक्षनेता सरकारला वठणीवर आणू शकतो हे दरेकर यांनी दाखवून दिले - विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस - Devendra Fadnavis
विरोधी पक्षनेते म्हणून प्रविण दरेकर यांनी हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेत वेगवेगळ्या खात्यांमध्ये चाललेला भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचे काम केले आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी एक मोठी लढाई लढली. प्रविण दरेकर यांच्या संसदीय कामकाजाच्या अहवालाचे प्रकाशन आज विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
मुंबई - विरोधी पक्षनेते म्हणून प्रविण दरेकर यांनी हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेत वेगवेगळ्या खात्यांमध्ये चाललेला भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचे काम केले आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी एक मोठी लढाई लढली. विरोधी पक्षनेता सरकारला कशा प्रकारे वठणीवर आणू शकतो, हे प्रविण दरेकर यांनी दाखवून दिले, असे उदगार विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले. दरेकर यांच्या संसदीय कामकाजाच्या अहवालाचे प्रकाशन ( Pravin Darekar report on parliamentary proceedings ) शुक्रवारी ( ४ फेब्रुवारी ) विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते.
महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचारावर हल्लाबोल
डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधीमंडळ हिवाळी अधिवेशनातील विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या संसदीय कामकाजाच्या अहवालाचे प्रकाशन आज विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आमदार प्रसाद लाड उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते दरेकर यांनी अतिशय प्रभावीपणे शेतकरी, कामगार, वंचित या विविध विषयांवर आवाज उठवला. इतकेच नाही तर महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचारावर हल्लाबोल केला. त्यांनी केलेले कामकाज या अहवालातून सामान्य माणसांपर्यंत घेऊन जाण्याचे काम ते करत आहेत. म्हणून मी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना मनापासून शुभेच्छा देतो.
शेतकरी, कामगार, वंचित यांना भेडसावणारे विविध विषय विधानपरिषदेत मांडले
ओबीसी आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल, यासंदर्भात सरकारला अक्षरक्ष: त्यांनी जेरीस आणले. त्यांची हिवाळी अधिवेशनातील विधानपरिषदेतील जी काही निवडक भाषणे आहेत, त्यावर आधारित हा अहवाल प्रकाशित झालाय ही अतिशय चांगली परंपरा आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले. कोरोनामुळे फक्त पाच दिवसांच्या कालावधीत झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी शेतकरी, कामगार, वंचित यांना भेडसावणारे विविध विषय विधानपरिषदेत उपस्थित केले. दरेकर यांनी विधानपरिषदेत मांडलेल्या विविध प्रश्नामुळे ज्वलंत विषयांना वाचा फुटु शकली. सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी याची मोलाची मदत झाली. याच मुद्यापैकी ५० निवडक महत्त्वाच्या विषयांच्या भाषणांच्या मुद्दयांचा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.