महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pravin Darekar Reaction After Farewell : विकास साधणे हेच अंतिम उद्दिष्ट - प्रवीण दरेकर - प्रवीण दरेकर

विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता या जबाबदारीने राज्यभर जनतेच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी फिरलो. राज्यात कुठलेही संकट आले असता कधीही शांत बसलो नाही. सभागृहात आणि सभागृहाबाहेर जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहिलो. अशाप्रकारे सभागृहाच्या माध्यमातून मिळालेल्या हक्कांच्या आधारे जनतेचा विकास साधायचा हेच अंतिम उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज निवृत्त सदस्यांच्या निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत ( Pravin Darekar Reaction After Farewell ) होते.

प्रवीण दरेकर
प्रवीण दरेकर

By

Published : Mar 23, 2022, 8:42 PM IST

मुंबई - विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता या जबाबदारीने राज्यभर जनतेच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी फिरलो. राज्यात कुठलेही संकट आले असता कधीही शांत बसलो नाही. सभागृहात आणि सभागृहाबाहेर जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहिलो. अशाप्रकारे सभागृहाच्या माध्यमातून मिळालेल्या हक्कांच्या आधारे जनतेचा विकास साधायचा हेच अंतिम उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज निवृत्त सदस्यांच्या निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत ( Pravin Darekar Reaction After Farewell ) होते.

निवृत्त विधान परिषद सदस्यांचे मानले आभार -निवृत्त विधान परिषद सदस्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी बोलताना दरेकर म्हणाले , विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर हे सभागृहात कुठलाही मुद्दा उपस्थित करताना सांभाळून घेत असे. प्रत्येक सदस्याला बोलायची संधी देत असे. चूक असल्यास अधिकारवाणीने सांगत असे. दिवाकर रावते हे संघटनात्मक कामासाठी आदर्श आहेत. कामासाठी फिरणे, अभिनव संकल्पना मांडणे, पक्ष वाढवणे, लोकांचे विषय जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करणारे नेते म्हणून मी विद्यार्थी चळवळीत असल्यापासून त्यांना पाहत आहे. माय मराठी भाषेचा आदर व्हावा यासाठी त्यांनी कायम आग्रही भूमिका सभागृहात मांडली आहे, असेही दरेकर म्हणाले.

सदाभाऊ खोत यांची शेतकऱ्यांचे नेते म्हणून वेगळी ओळख -विधान परिषद सदस्य संजय दौंड यांनीही सभागृहात कामकाजासाठी अतिशय चांगल्या प्रकारचे योगदान दिले आहे. त्याचप्रकारे रवी फाटक यांनी पालघर आणि ठाणे व त्यांच्या मतदार संघाच्या प्रश्नाला वाचा फोडली आहे. सुभाष देसाई यांनी शिवसेनेचे नेते या नात्याने तसेच सरकारच्या माध्यमातून व सभागृहाच्या माध्यमातून सभागृहात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. प्रसाद लाड यांनीदेखील सभागृहातील कामकाजात अत्यंत मेहनत घेतली आहे. विविध आयुधांच्या माध्यमातून सभागृहाच्या कामकाजात सहभाग घेतला आहे. विनायक मेटे यांनी टोकाचा आग्रह धरणारा नेता म्हणून ओळख निर्माण केली आहे. सुरजितसिंह ठाकूर यांनीही स्वतःची कुशल संघटक म्हणून ओळख निर्माण केली आहे. सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांचे नेते म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सभागृहात आणि सभागृहाबाहेर देखील त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आग्रहाने भूमिका मांडली आहे, असे दरेकर म्हणाले.

या आमदारांचा निरोप समारंभ- आज (दि. 23 मार्च) विधान परिषदचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासह, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, संजय दौंड, प्रसाद लाड, दिवाकर रावते, रवी पाठक, सुभाष देसाई, विनायक मेटे, सुरजितसिंह ठाकूर, सदाभाऊ खोत हे विधान परिषद सदस्य यांचा निरोप समारंभ करण्यात आला.

भाजपने कायम माझा सन्मान केला. यासाठी पक्षाचा ऋणी राहीन. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भारतीय जनता पार्टी अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादामुळे विधानपरिषदेच्या विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी मिळाली, अशी भावना प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली.

हेही वाचा -Shivsena Important Meet : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली शिवसेनेच्या आमदार, मंत्र्यांची बैठक

ABOUT THE AUTHOR

...view details