महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pravin Darekar Bail : प्रवीण दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर, उच्च न्यायालयाकडून दिलासा - BJP Leader Praveen Darekar

भाजप नेते प्रवीण दरेकर ( BJP Leader Praveen Darekar ) यांच्यावर मुंबई बँक फसवणूक प्रकरणात रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विरोधात प्रवीण दरेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली असून उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.

प्रवीण दरेकर
प्रवीण दरेकर

By

Published : Mar 29, 2022, 4:55 PM IST

मुंबई - भाजप नेते प्रवीण दरेकर ( BJP Leader Praveen Darekar ) यांच्यावर मुंबई बँक फसवणूक प्रकरणात रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विरोधात प्रवीण दरेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली असून उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. प्रवीण दरेकर यांना दोन आठवड्याचा दिलासा मिळाला आहे.

काय आहे प्रकरण..? - 2017 च्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये काम केल्याबद्दल दरेकर यांनी 25 हजार 700 रुपयांची मजूरी घेतल्याची नोंद आहे. डिसेंबर, 2017 मध्ये नागपूर अधिवेशन सुरू असताना मजूर म्हणून काम केल्याचा परतावा कसा घेतला ? मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी असताना दरेकर यांनी अनेक घोटाळे केले असल्याचे आरोप करण्यात आले ( Mumbai Bank Case ) होते. प्रवीण दरेकर हे बँकेच्या संचालक मंडळावर निवडून गेले होते. मात्र, त्यांनी मजूर या प्रवर्गातून अर्ज दाखल केला होता. प्रवीण दरेकर यांनी बोगस पद्धतीने मजूर म्हणून नोंदणी केली असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी आता चौकशी सुरू आहे. त्यामुळे दरेकरांच्या अडचणी वाढल्या आहेत.

हेही वाचा -Nitin Raut on Power shortage : राज्यात मोठ्या प्रमाणात वीज टंचाई; राज्य अंधारात लोटणार नाही - नितीन राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details