महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pravin Darekar on Sanjay Raut : संजय राऊत यांची पत्रकार परिषद म्हणजे फुसका बार - दरेकर - भाजप नेते मोहित कंबोज

संजय राऊत हे भारतीय जनता पक्षाचे ( Sanjay Raut on BJP ) साडेतीन नेत्यांबाबत बोलणार होते. मात्र, त्यांना एकाही नेत्यांचे नाव घेता आले नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर ( Pravin Darekar on Sanjay Raut ) केली. ते म्हणाले, भाजप नेते किरीट सोमैया ( BJP Leader Kirit Somaiya ) यांच्या विरोधात संजय राऊत त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी पोलीस किंवा गृह खात्याकडे याबाबत तक्रार करावी. किरीट सोमैया यांच्या विरोधात चौकशी लावावी. मात्र, तसे न करता केवळ संजय राऊत आरोप करत आहेत. तसेच किरीट सोमैया यांच्या विरोधात कारवाईची मागणी संजय राऊत करत आहेत. मात्र, ते सत्तेत आहेत त्यामुळे सत्तेतल्या पक्षाने कधी मागणी करायची नसते, कारवाई करायचे असते, असा सल्लाही प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांना दिला.

प्रवीण दरेकर
प्रवीण दरेकर

By

Published : Feb 15, 2022, 7:07 PM IST

Updated : Feb 15, 2022, 7:57 PM IST

मुंबई- शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेली पत्रकार परिषद ( Sanjay Raut Press Conference ) म्हणजे फुसका बार होता. केवळ फुसका बारच नाहीतर फुसका बारच्या खाली देखील जर काही असेल तर त्या प्रकारची ही पत्रकार परिषद होती, अशी खरमरीत टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ( Pravin Darekar on Sanjay Raut ) यांनी संजय राऊत यांच्यावर केली. आपण सकाळीच म्हणालो होतो की, संजय राऊत यांची पत्रकार परिषद फुसका बार असेल त्याप्रमाणेच आज तो फुसका बार ठरला.

बोलताना प्रवीण दरेकर

सत्तेत असलेल्या पक्षाने मागणी नाही तर कारवाई करायची असते - संजय राऊत हे भारतीय जनता पक्षाचे ( Sanjay Raut on BJP ) साडेतीन नेत्यांबाबत बोलणार होते. मात्र, त्यांना एकाही नेत्यांचे नाव घेता आले नाही. भाजप नेते किरीट सोमैया ( BJP Leader Kirit Somaiya ) यांच्या विरोधात संजय राऊत त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी पोलीस किंवा गृह खात्याकडे याबाबत तक्रार करावी. किरीट सोमैया यांच्या विरोधात चौकशी लावावी. मात्र, तसे न करता केवळ संजय राऊत आरोप करत आहेत. तसेच किरीट सोमैया यांच्या विरोधात कारवाईची मागणी संजय राऊत करत आहेत. मात्र, ते सत्तेत आहेत त्यामुळे सत्तेतल्या पक्षाने कधी मागणी करायची नसते, कारवाई करायचे असते, असा सल्लाही प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांना दिला.

आजची पत्रकार परिषद म्हणजे केवळ इव्हेंट -संजय राऊत यांनी आज घेतलेली पत्रकार परिषद म्हणजे केवळ इव्हेंट आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या बाबत कोणाचाही काही आक्षेप असल्यास त्यांनी न्यायालयात जावे. तपास यंत्रणा काही चुकीचे करत असल्यास त्याविरोधात न्यायालयात दाद मागून ते सिद्ध करावे. मात्र, तसे महाविकासआघाडीकडून केले जात नाही. तसेच पत्रकार परिषदेतून भाजप नेते मोहित कंबोज ( BJP Leader Mohit Kamboj ) यांच्यावर आरोप करण्यापेक्षा त्यांच्या विरोधात तक्रार संजय राऊत यांनी पोलिसांत तक्रार करावी. राज्यात सत्ता त्यांचीच आहे, गृह खात्याकडून चौकशी करावी. संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाच्या बाबत चौकशी सुरू झाल्यामुळे आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मुलीच्या लग्नाबाबत ते आरोप करत आहेत, असा टोलाही प्रवीण दरेकर यांनी यावेळी लगावला.

केवळ जनतेचे लक्ष वेधण्यासाठी केलेले आरोप - दोन दिवसांपासून भाजपच्या साडेतीन नेत्यांचे नाव सांगणार, असे म्हणत आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र, ते साडेतीन कोण याबाबत त्यांनी खुलासा केला नाही. यामुळे ही पत्रकार परिषद केवळ राज्यातील जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी होती अशी मिश्कील टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्याबाबत तक्रार करावी व चौकशी करावी, असा सल्लाही दानवे यांनी यावेळी राऊत यांना दिला.

बोलताना केंद्रीय मंत्री दानवे

हेही वाचा -Sanjay Raut Allegation on Kirit Somaiya : राकेश वाधवानचा किरीट सोमैयांशी आर्थिक संबंध; राऊतांचा आरोप

Last Updated : Feb 15, 2022, 7:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details