महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सत्ता टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंचे मौन पुरेसे आहे : प्रवीण दरेकर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन पाळलं असून खुर्चीसाठी शांत बसणं, सत्ता टिकवणं, हेच त्यांचं आता उद्दिष्ट आहे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

Pravin Darekar
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

By

Published : Apr 7, 2021, 4:54 AM IST

मुंबई - महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट पुन्हा एकदा घोंगावत आहे. अशात सरकारशी संबंधित अनेक प्रकरणे समोर येत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन पाळलं असून खुर्चीसाठी शांत बसणं, सत्ता टिकवणं, हेच त्यांचं आता उद्दिष्ट आहे, अशी थेट टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. गृहमंत्र्यांचा राजीनामा, सीबीआय चौकशी या संदर्भात सरकारने सर्वोच्च न्यायालयात केलेले अपील यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती, त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा -आणखी काही मंत्री राजीनामा देतील; केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे भाकित

लॉकडाऊनमुळे राज्यात अराजकता निर्माण होईल

राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडत आहे. परंतु, लॉकडाऊन किंवा मिनी लॉकडाऊन राज्यातील सर्वसामान्य लोकांना परवडणारा नाही. लॉकडाऊनचे नियम पाहिले तर मोठ्या प्रमाणावर विसंगती पाहायला मिळते. लोकांच्या पोटावर पाय येत असल्यामुळे दुर्दैवाने राज्यात अराजकतासुद्धा निर्माण होऊ शकते. जीवनावश्यक वस्तूंची दुकानंही बंद केली जात असून त्यामुळेच व्यापारी रस्त्यावर उतरले आहेत. भाजपने केलेल्या विनंतीप्रमाणे जर सरकारने कष्टकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये टाकले असते तर लोकांचा उद्रेक झाला नसता, असे दरेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आरोग्य व्यवस्था सुरळित करा

महाराष्ट्राची एकूण परिस्थिती पहिली तर हॉस्पिटल हाऊसफुल्ल होण्याची शक्यता अगोदरपासुन विरोधकांनी वर्तवली होती. आज आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड शिल्लक नसल्याची माहिती समोर येत आहे. पण हे सरकार बेफिकिरीने वागत आहे. मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला त्यावेळी सांगितले होते की, आरोग्य व्यवस्था आणि क्षमता वाढवली आहे. मग आज बेडस, वेंटीलेटर का उपलब्ध होत नाहीत ? त्यामुळे सरकारने तत्काळ आरोग्य व्यवस्था सुरळीत करावी, अशी विनंतीही प्रवीण दरेकर यांनी सरकारला केली आहे.

हेही वाचा -कोरोना रोखण्यासाठी नियमावली मात्र विविध स्तरातून तीव्र विरोधच

ABOUT THE AUTHOR

...view details