मुंबई - आरे कारशेड पहाडीमध्ये हलविण्याची सरकार घेत असलेली भूमिका केवळ अहंकारासाठी आहे. यामुळे महाराष्ट्राचे नुकसान होणार आहे, अशी प्रतिक्रीया विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली. तसेच न्यायालयाने मान्यता दिल्यानंतर आवश्यक ती झाडे तोडून झाली आहेत. यावर मोठ्या प्रमाणात खर्च झालेला असताना कारशेड हलविण्याचा अट्टाहास कोणासाठी? आरे शेडवर झालेल्या खर्चाची जबाबदारी कोण घेणार? याचा जाब मुंबईकर सरकारला विचारतील असेदेखील प्रविण दरेकर म्हणाले.
'आरे कारशेड हलविण्याची भूमिका केवळ अहंकारासाठी' - प्रविण दरेकर न्यूज
मेट्रो-3 चे कारशेड आरेमध्ये करण्यासाठी हजारो झाडांच्या कत्तली करण्यात आल्या होत्या. परंतु, झाडांच्या कत्तलीमुळे वादग्रस्त ठरलेले मेट्रो-3 चे कारशेड दुसरीकडे हलवण्याची चर्चा काल मेट्रो प्रकल्पाबाबत घेण्यात आलेल्या बैठकीत झाल्याची माहिती समोर येत आहे. गोरेगाव येथील पहाडी भागात मेट्रो कारशेड हलवता येईल का यासंबंधी चर्चा करण्यात आली.
मेट्रो-3 चे कारशेड आरेमध्ये करण्यासाठी हजारो झाडांच्या कत्तली करण्यात आल्या होत्या. परंतु, झाडांच्या कत्तलीमुळे वादग्रस्त ठरलेले मेट्रो-3 चे कारशेड दुसरीकडे हलवण्याची चर्चा काल मेट्रो प्रकल्पाबाबत घेण्यात आलेल्या बैठकीत झाल्याची माहिती समोर येत आहे. गोरेगाव येथील पहाडी भागात मेट्रो कारशेड हलवता येईल का यासंबंधी चर्चा करण्यात आली. मेट्रो प्रकल्पाबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली.
आरे कारशेडवरून याआधीच भाजप व शिवसेना यात वाद रंगला होता. त्यात आता महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे कारशेड आरेमध्ये न करता दुसरीकडे करण्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजप नेते शिवसेना सरकारवर टीका करत आहे.