महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pravin Darekar Application in Court : मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव

प्रवीण दरेकर यांनी न्यायालय देण्यात आलेल्या अर्जामध्ये म्हटले आहे की राज्य सरकारकडून माझ्या विरोधात राजकीय सुरू बुद्धीतून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्यात यावी तसेच अटकपूर्व जामीन देण्यात यावा अशी विनंती मुंबई उच्च न्यायालयाला करण्यात आली आहे.

Pravin Darekar
Pravin Darekar

By

Published : Mar 16, 2022, 10:34 AM IST

मुंबई - राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्थानक मुंबई बँक फसवणुकी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी प्रवीण दरेकर यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यात यावी अशी विनंती उच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे. या अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.

प्रवीण दरेकर यांनी न्यायालय देण्यात आलेल्या अर्जामध्ये म्हटले आहे की राज्य सरकारकडून माझ्या विरोधात राजकीय सुरू बुद्धीतून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्यात यावी तसेच अटकपूर्व जामीन देण्यात यावा अशी विनंती मुंबई उच्च न्यायालयाला करण्यात आली आहे. प्रवीण दरेकर यांनी मुंबई बँकेच्या संचालकपदी निवडणूक लढवून 20 वर्षे फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून यांच्याविरोधात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्थेविरोधात गुन्हा नोंदवला आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षाने त्यांच्या अटकेची मागणी केली आहे तर दरेकरांवर राजकीय सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

आम आदमी पार्टीचे नेते धनंजय शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गेली 20 वर्षे मजूर असल्याचे खोटे भासवून प्रवीण दरेकर हे मुंबई बँकेवर संचालक अध्यक्ष म्हणून निवडून येत आहेत. यादरम्यान मुंबई बँकेत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाले असून त्याबाबत सहकार विभागाने वेळोवेळी सहकार कायदा चौकशी करून अहवाल दिले आहेत. 2015 पासून नाबार्डच्या प्रत्येक अहवालात अनियमितता व घोटाळ्यांवर ठपका ठेवलेला आहे असे तक्रारीत नमूद आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details