महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pravin Darekar on Meow Sound : राज्य सरकार नियोजनबद्ध पद्धतीने राणेंवर कारवाई करतंय; प्रवीण दरेकरांचा आरोप - आमदार नितेश राणे म्याऊ म्याऊ आवाज

हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session 2021) दुसऱ्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Minister Aaditya Thackeray) यांना म्याऊ म्याऊ (Meow Meow Sound) अशा शब्दाचा प्रयोग करून डिवचण्याचा प्रकार भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी केला, तो त्यांच्या अंगलट आलेला आहे. यावर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकार राणेंवर नियजनबद्ध पद्धतीने कारवाई करत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे.

pravin darekar
प्रवीण दरेकर

By

Published : Dec 29, 2021, 6:22 PM IST

Updated : Dec 29, 2021, 10:38 PM IST

मुंबई -महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांच्याबाबतीत सुडाच्या भावनेने वागत आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर जो प्रकार झाला तो निंदनीय आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीसुद्धा सभागृहामध्ये ती भूमिका मांडली. परंतु त्याचा राग मनात ठेवून पोलिसांवर दबाव आणून नियोजनबद्ध पद्धतीने नितेश राणे (MLA Nitesh Rane) व नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर कारवाई केली जात आहे, असा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

माहिती देताना प्रवीण दरेकर
  • नितेश राणेंना अडकवण्याचा प्लान अगोदरच ठरला होता -

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना म्याऊ म्याऊ अशा शब्दाचा प्रयोग करून डिवचण्याचा प्रकार भाजप आमदार नितेश राणे यांनी केला, तो त्यांच्या अंगलट आलेला आहे. आता नितेश राणे नाही तर त्यांचे पिता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनासुद्धा या प्रकरणांमध्ये नोटीस बजावण्यात आलेली आहे. याबाबत बोलताना विधान परिषद विरोधी पक्षनेते दरेकर यांनी हा सर्व नियोजनबद्ध कार्यक्रम आहे, असे सांगितले आहे. मागच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, सिंधुदुर्गचे पालकमंत्री तसेच गृहराज्यमंत्री आणि खासदार हे सिंधुदुर्गात दौऱ्यावर होते व तेव्हाच हा संपूर्ण प्लान तयार करण्यात आला, असेही दरेकर यांनी सांगितले. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची सत्ता सतीश सावंत यांच्याकडून राणे यांच्याकडे येणार असल्याची भीतीसुद्धा त्यांना असल्याने हे कट कारस्थान रचण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

  • शिवसेनेकडून नितेश राणे यांना धोका-

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये नितेश राणे यांचा ठावठिकाणा सांगितला असता तर शिवसेनेकडून त्यांच्या जिवाला धोका असता, असेही दरेकर म्हणाले. जर शेकडो शिवसैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला असता तर त्याला जबाबदार कोण? त्याचप्रमाणे पोलिसांचा फौजफाटा जाऊन त्यांनी नितेश राणे यांना जेरबंद केले असते व न्याय मागण्याची संधी दिली नसती तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्नही दरेकर यांनी उपस्थित केला आहे. मुलाचा ठावठिकाणा हा वडिलांना माहिती असायला पाहिजे, परंतु पोलिसांकडून त्यांचा गैरवापर होऊ शकतो, असेही दरेकर म्हणाले. यापूर्वीही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अवमानित करून गैर पद्धतीने अटक करण्यात आली होती. राज्य सरकार भाजपला राज्यात धडा शिकवण्यासाठी अशा पद्धतीने कारस्थान करत आहे, असेही दरेकर म्हणाले. परंतु कोकणातली जनता, भाजप व राणे यांच्या पाठीशी ठामपणे उभी असून या सर्व गोष्टींना ते सामोरे जातील, असेही त्यांनी सांगितले आहे.

Last Updated : Dec 29, 2021, 10:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details