मुंबई - भाजपाचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी चित्रा वाघ यांची बाजू घेत सत्ताधारी सरकारवर टीका केली आहे. चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर चांगलेच संतापले आहेत आणि त्यांनी सरकारला प्रश्न केला आहे की, जर सरकारच्या मंत्र्यांच्या विरोधात बोललं तर यंत्रणेचा गैरवापर होत असेल तर, हे चुकीचं आहे. त्याचा आम्ही निषेध करतो.
न्यायासाठी भाजपा लढत राहील-
प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीवर केलेला गुन्हा दाखल हा राजकीय सूडभावनेतून केला असल्याचं दिसून येत आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत. न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. आताचं माध्यमांच्या मार्फत ही गोष्ट पुढे आणणं म्हणजे या ही सूडभावनेतून केलेली कारवाई आहे.