महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ग्लोबल टेंडर काढून मुंबईकरांचे लसीकरण मोफत करा - प्रवीण दरेकर - मुंबई कोरोना अपडेट

ग्लोबल टेंडर काढून मुंबईकरांचे लसीकरण मोफत करा, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे. यावर आयुक्तांनी ग्लोबल टेंडर काढण्याचे आश्वासन दिल्याची माहिती दरेकर यांनी दिली.

Praveen Darekar demanded to make the vaccination of Mumbai citizens free by issuing global tenders
ग्लोबल टेंडर काढून मुंबईकरांचे लसीकरण मोफत करा - प्रवीण दरेकर

By

Published : May 10, 2021, 7:57 PM IST

मुंबई - शहरामध्ये लसीचा तुटवडा सुरु आहे. नागरिकांना लस मिळत नाही. पालिकेच्या नियोजन शून्य काराभारामुळे हे सर्व होत आहे. यामुळे मुंबई महापालिकेने ग्लोबल टेंडर मागवून लस विकत घ्याव्यात आणि मुंबईकर नागरिकांना मोफत लस द्यावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली. यावर आयुक्तांनी ग्लोबल टेंडर काढण्याचे आश्वासन दिल्याची माहिती दरेकर यांनी दिली.

ग्लोबल टेंडर काढा -

मुंबईमधील लसीकरणाबाबत आज भाजपच्या शिष्ट मंडळाने पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांची भेट घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत दरेकर बोलत होते. यावेळी बोलताना रविवारी आम्ही पालिका आयुक्तांची भेट मागितली होती. मात्र, भेट नाकारण्यात आली होती. आजच्या भेटीदरम्यान केंद्र सरकार २५ वर्षावरील नागरिकांसाठी लस पाठवत आहे. मुंबईत १८ ते ४४ वायामधील ५० लाख ५० हजार नागरिक आहेत. या नागरिकांना लस देण्यासाठी ३५० कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. पालिकेच्या बँकांमध्ये करोडोंच्या ठेवी आहेत. त्यामुळे पालिकेने हा खर्च करावा अशी मागणी करण्यात आल्याची माहिती दरेकर यांनी दिली.

भाजपाशी पक्षपात -

मुंबईत नागरिकांना लस मिळावी यासाठी २२७ म्हणजेच प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डमध्ये लसीकरण केंद्र उभारले जात आहे. मात्र, भाजप नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये लसीकरण केंद्र उभारण्यास पालिका आयुक्त आडकाठी आणत आहेत. शिवसेनेच्या नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये पालिका आयुक्त लसीकरण केंद्र सुरु करण्याची परवानगी देत आहेत. हा भाजपाशी पक्षपात केला जात असल्याचा आरोप दरेकर यांनी केला. पालिकेचा मनमानी कारभार चालू देणार नाही असा इशारा दरेकर यांनी दिला.

कौतुकाचे ढोल पिटावेल जात आहेत -

मुंबईमध्ये कोरोना रुग्णांचे आणि मृत्यूचे आकडे लपवले जात आहेत. चाचण्या कमी केल्याने रुंगांची संख्या कमी दिसत आहे. लपवाछपवी करू नका संभाव्य धोका ओळखा असे असे दरेकर म्हणाले. नीती आयोगाने काय म्हटले हे आम्हाला माहित नाही. अशा पीआरच्या बातम्या पुढे करून पालिका कौतुकाचे ढोल पिटत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details