मुंबई -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या ( Narendra Modi Speech In Parliament ) भाषणानंतर काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकार व भाजपवर टीका करण्यास सुरूवात केली ( Congrees Critisized Narendra Modi ) आहे. या टीकेचा समाचार घेताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ( Praveen Darekar Critisized Congress ) यांनी मोदींच्या भाषणावर काँग्रेस नेत्यांची आगपाखड होणे स्वाभाविक आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
'आगपाखड होणे स्वाभाविक आहे' -
मोदींनी संसदेमध्ये केलेल्या भाषणानंतर काँग्रेसची आगपाखड होणे स्वाभाविक आहे. गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षात गरिबी हटावचा नारा देणाऱ्या काँग्रेसने गरिबी हटवण्यासाठी काहीच केले नाही. मोदींच्या भाषणावर टिपणी करण्याचे काम सध्या काँग्रेस करत आहे. परंतु प्रत्येक गोष्टीचा उलगडा मोदींनी केला आहे. यावर ते उत्तर देऊ शकत नाही. स्पष्टीकरण देऊ शकत नाहीत. कोरोना काळात गरीब कल्याणासाठी पंतप्रधान योजना केल्या. त्या देशाने पाहिल्या आहेत. रेशनिंगच्या दुकानात गरीबांसाठी अन्नधान्य उपलब्ध करून दिलं. परंतु राज्य सरकारने गरिबांना दमडी सुद्धा दिली नाही, असे दरेकर म्हणाले.