मुंबई -शेतकऱ्यांच्या वीज जोडणीच्या मुद्द्यावर चर्चा सुरु असताना, सत्ताधाऱ्यांच्या बाकावरुन शेतकऱ्यांना चोर ( Council Members Call Farmers Thieves ) संबोधण्यात आले. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यावरुन आक्रमक होत, संबंधितांनी शेतकऱ्यांचा अवमान केला असून त्यांची माफी मागावी, अशी मागणी विधान परिषदेत केली.
दरेकरांनी सरकारला धरले धारेवर -
शेतकऱ्यांच्या वीज तोडणीच्या मुद्द्यांवरील लक्षवेधी सचूनेच्या वेळी सदस्य गोपीचंद पडळकर वीज प्रश्नावर आपली भूमिका मांडत होते. यावेळी सत्ताधारी बाजूच्या बाकांवरुन काही सदस्यांनी शेतकरी चोऱ्या करतात, अशा प्रकारचे संतापजनक वक्तव्य केले. विरोधी पक्ष नेते दरेकर या वेळी आक्रमक झाले. शेतकरी काय चोर आहे का? शेतकऱ्याला चोर समजता काय तुम्ही? स्वतः तुम्ही चोऱ्या करता आणि शेतकऱ्याला चोर म्हणता? असे सवाल करत दरेकर यांनी सरकारला धारेवर धरले. भाजपाच्या सदस्यांनी त्या वक्तव्याचा निषेध केला व घोषणाबाजी केली. त्यामुळे उपसभापती निलम गोर्शए हे यांनी सभागृहाचे कामकाज पाच मिनिटासाठी तहकूब केले.
हेही वाचा -Shakti Act passed - शक्ती कायदा विधानसभेत एकमताने मंजूर; या कायद्याने काय होणार? वाचा..