मुंबई -देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे दिसत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे. देशात ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि लसीचा तुटवडा जाणवत आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना दिसत आहे. नवाब मलिक यांनी कमी बोलावं, कमी बोलल्यास त्यांच्या अडचणी कमी होतील, अशा शब्दात विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मलिक यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू होतो आहे. देशाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. मात्र राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. केवळ केंद्र सरकारला टारगेट करून आणि दुसऱ्या राज्यातील स्वतःच्या सोयीची असलेली उदाहरणे देऊन राजकारण करण्याचा प्रयत्न मंत्री नवाब मलिक करतात, त्यामुळे ते जरा कमी बोलले तर त्यांच्या अडचणी कमी होतील असे प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
'मलिक केवळ केंद्रावर टीका करत आहेत'