मुंबई - राज्यात एकीकडे कोरोनाच थैमान सुरू असताना राजकारण मात्र जोरात सुरू आहे. आज महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांनी भाजपावर इंजेक्शनचा तुटवडा केल्याचा गंभीर आरोप केले आहे. त्यांच्या आरोपा नंतर भाजपा आमदार आणि विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिउत्तर दिले आहे. त्यांनी नवाब मलिक यांचे आरोप फेटाळून लावले आहेत आणि आपल्या जावयाला अटक झाली असल्याकारणाने मंत्री नवाब मलिक हे पिसाळल्यासारखे आरोप करत असल्याची टीका त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
मालिकांच्या आरोपांना उत्तर देताना मुंबई बॉम्बस्फोटमधील जमीन कोणी खरेदी केल्या? कोरोना कमी झाला की लगेच ही सगळी प्रकरणे समोर आणू, असा इशारादेखील त्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीदेखील रेमेडेसिवीरचे वाटप केले त्यांची चौकशी का केली नाही मग? दिलीप गायकवाड या बारामतीच्या कार्यकर्त्याने पॅरासिटामॉलचे पाणी औषध म्हणून वापरले आणि लोकांना वाटले. त्याची चौकशी का केली नाही? यांची आधी नवाब मलिक यांनी उत्तरे द्यावीत असे त्यांनी म्हटले आहे.