महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

VIDEO : सदनात क्लीन चिटची मागणी करताना सरनाईक गहिवरले - , monsoon session, Live maharashtra legislative assembly monsoon session , Live, maharashtra legislative assembly, monsoon session, maharashtra assembly, monsoon session, live updates, BJP, Shivsena, Congress, NCP, Uddhav Thackeray, Ajit Pawar, Nana Patole, Devendra Fadnavis, Balasaheb Thorat, महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन, महाराष्ट्र विधानसभा, पावसाळी अधिवेशन, विधानसभेचे पावसाळी अधिवेशन, महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन 2021, पावसाळी अधिवेशन 2021, महाविकास आघाडी, महाराष्ट्र राजकारण, महाविकास आघाडी, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र राजकारण बातम्या, ताज्या बातम्या, राजकारण, बातम्या

आमदार प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंना लिहलेल्या पत्रानंतर त्या पत्राची चर्चा जोरदार रंगली. या पत्रात सरनाईक यांनी भाजपसोबत पुन्हा जुळवून घेण्याची मागणी केली होती. मंगळवारी सभागृहात प्रताप सरनाईक यांनी मला क्लिनचीट देण्यात यावी, अशी मागणी केली. ईडीकडून प्रताप सरनाईक यांची चौकशी सुरू आहे.

प्रताप सरनाईक
प्रताप सरनाईक

By

Published : Jul 6, 2021, 6:56 PM IST

Updated : Jul 6, 2021, 7:43 PM IST

मुंबई- आमदार प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंना लिहलेल्या पत्रानंतर त्या पत्राची चर्चा जोरदार रंगली. या पत्रात सरनाईक यांनी भाजपसोबत पुन्हा जुळवून घेण्याची मागणी केली होती. मंगळवारी सभागृहात प्रताप सरनाईक यांनी मला क्लिनचीट देण्यात यावी, अशी मागणी केली. ईडीकडून प्रताप सरनाईक यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान राज्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासाचा अहवाल जाहीर करुन क्लीनचिट द्यावी अशी मागणी सरनाईक यांनी केली. ईडीकडून एमएमआरडीएमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याची चौकशी करण्यात येत आहे. याच चौकशीच्या फेऱ्यात आमदार प्रताप सरनाईक आहेत.

VIDEO : सदनात क्लीन चिटची मागणी करताना सरनाईक गहिवरले

मीही त्यांच्यापैकी एक आहे -

“तुमचा भुजबळ करू, अनिल देशमुख करू” अशा प्रकारची धमकी विरोधकांकडून दिली जाते, अशी तक्रार काही सदस्यांकडून केली गेली. याचा संदर्भ आज सरनाईक यांच्याकडून देण्यात आला. सरनाईक म्हणाले की, मीसुद्धा त्यांच्यापैकी एक आहे. चर्चेत भूजबळ आणि अनिल देशमुख यांचे नाव घेतले जाते. हा प्रताप सरनाईक देखील त्यातलाच एक भाग आहे. मागच्या सात महिन्यांपासून सरनाईक या तपास यंत्रेणेला सामोरे जातो आहे.

एमएमआरडीएमध्ये सुरक्षा रक्षक पुरवण्यासंदर्भात माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. राज्य सरकारनं याचा तपास करावा अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी केली. सुरक्षा रक्षक पुरवण्यात करोडोंचा भ्रष्टाचार झाला असं म्हटलं जातं. गृह विभागाच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात यासंदर्भात गुन्हा दाखल झाला. तो तपास ईडीने नंतर स्वत:कडे घेतला. पण आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या माध्यमातून असा घोटाळा झाला आहे किंवा नाही याचा तपास करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. त्यामुळे माझ्यावर असे आरोप होत असताना ते राज्य सरकारवर देखील होत आहेत”, असं सरनाईक यावेळी म्हणाले.

Last Updated : Jul 6, 2021, 7:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details