महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'आता बारा वाजणार'; प्रकाश मेहतांचा इशारा - माजी मंत्री प्रकाश मेहता

माजी मंत्री प्रकाश मेहता यांचे घाटकोपर पूर्व मतदारसंघातून पक्षाने तिकीट कापल्यानंतर त्यांनी संतप्त कार्यकर्त्यांसमोर आपली नाराजी व्यक्त केली. पक्षाने तिकीट कापल्याची खंत असून, हा निर्णय मला न विचारता घेतल्याचे ते म्हणाले.

माजी मंत्री प्रकाश मेहता यांचे घाटकोपर पूर्व मतदारसंघातून पक्षाने तिकीट कापल्यानंतर त्यांनी संतप्त कार्यकर्त्यांसमोर आपली नाराजी व्यक्त केली.

By

Published : Oct 4, 2019, 2:05 PM IST

Updated : Oct 4, 2019, 4:18 PM IST

मुंबई - माजी मंत्री प्रकाश मेहता यांचे घाटकोपर पूर्व मतदारसंघातून पक्षाने तिकीट कापल्यानंतर त्यांनी संतप्त कार्यकर्त्यांसमोर आपली नाराजी व्यक्त केली. पक्षाने तिकीट कापल्याची खंत असून, हा निर्णय मला न विचारता घेतल्याचे ते म्हणाले.

माजी मंत्री प्रकाश मेहता यांचे घाटकोपर पूर्व मतदारसंघातून पक्षाने तिकीट कापल्यानंतर त्यांनी संतप्त कार्यकर्त्यांसमोर आपली नाराजी व्यक्त केली.

तसेच अपक्ष लढण्याच्या प्रश्नावर 'आता बारा वाजणार' असे बोलून एका अर्थी त्यांनी भाजप नेतृत्त्वाला इशारा दिला आहे.

भाजपने पालिकेतील नगरसेवक पराग शहा यांना उमेदवारी जाहीर केल्यांनतर ते प्रकाश मेहता यांच्या घरी किरीट सोमय्यांसोबत गेले होते. यावेळी मेहता यांच्या समर्थकांनी पराग शहा व मेहतांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामध्ये पराग शहा यांच्या खासगी सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण करण्यात आली, असून त्यांची गाडी फोडण्यात आली. तसेच किरीट सोमय्या यांनाही धक्काबुक्की झाली.

दरम्यान, पराग शहा गाडीतच बसून राहिले. शेवटी मेहता यांनी भावनिक होत शहा यांची गाडी कार्यकर्त्यांच्या तावडीतून बाहेर काढली. अशा प्रकारचे हाणामारीचे प्रकरण माझ्या राजकीय आयुष्यात कधीही घडले नसल्याचे प्रकाश मेहता यावेळी म्हणाले. पक्षाने मला आजवर भरभरून दिले असून, पक्षावर किंवा मुख्यमंत्र्यांवर कोणताही राग नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Last Updated : Oct 4, 2019, 4:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details