मुंबई- घाटकोपर पूर्वमधून माजीमंत्री प्रकाश मेहता यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने कार्यकर्ते संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. मेहता यांना तिकीट नाकारून भाजपने पराग शहा यांना उमेदवारी घोषित केली. यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी शहा यांची गाडी फोडली आहे.
भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर.. प्रकाश मेहतांच्या समर्थकांनी पराग शहांची गाडी फोडली, सोमय्यांनाही धक्काबुक्की - माजी मंत्री प्रकाश मेहता
मेहता यांना तिकीट नाकारून भाजपने पराग शहा यांना उमेदवारी घोषित केली. यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी शहा यांची गाडी फोडली आहे.
प्रकाश मेहतांच्या समर्थकांची तोडफोड
भाजपच्या चौथी यादी जाहीर झाल्यानंतर पराग शहा हे मेहता यांना घरी भेटायला गेले होते. यावेळी किरीट सोमय्या व पराग शहा यांच्या गाडीवर प्रकाश मेहता समर्थकांनी हल्ला केला. तसेच त्यांनी पक्षाच्या खासगी सुरक्षारक्षकांना जोरदार मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी माजी खासदार किरीट सोमय्या यांनाही धक्काबुक्की झाली.
पक्षाच्या चौथ्या यादीतही डिच्चू मिळाल्याने मेहता यांच्या घरी कार्यकर्त्यांची बैठक बोलवण्यात आली होती. त्यावेळी ही घटना घडली आहे.
Last Updated : Oct 4, 2019, 6:59 PM IST