मुंबई - वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस सोबतच्या आघाडी बाबत भाष्य केले.
काँग्रेसची अवस्था शिर नसलेल्या धडासारखी - प्रकाश आंबेडकर - लेाकसभा
लेाकसभा निवडणुकीत आमच्यापेक्षा काँग्रेसला मते अधिक मिळाली असली तरीही सध्या आमची चलती आहे. त्यामुळे राज्यात आम्ही काँग्रेसला ४० जागांची ऑफर करत आहोत. त्यांनी ती स्वीकारावी अन्यथा आम्ही सर्वच जागांवर उमेदवार उभे करण्यासाठी तयार आहोत.
![काँग्रेसची अवस्था शिर नसलेल्या धडासारखी - प्रकाश आंबेडकर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3846798-981-3846798-1563203520242.jpg)
सध्या राज्यात आणि देशातही काँग्रेसकडे केवळ धड राहिले आहे, डोके राहिलेले नाही. काँग्रेसचे संघटन तितके मजबूत राहिले नाही. यामुळे त्यांनी आम्ही दिलेल्या ऑफरचा स्वीकार करावा. अन्यथा आम्ही सर्वच जागांवर उमेदवार उभे करण्यासाठी तयार आहोत असे आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. राज्यात काँग्रेससोबत आघाडी करण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे, असा आरोप काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या काळात केला होता. याचा वचपा विधानसभेला काढण्याचा प्रयत्न वंचित कडून होताना दिसत आहे. आंबेडकर यांनी, काँग्रेसकडून अजून कोणताही प्रस्ताव आम्हाला आलेला नाही पण काँग्रेसला आम्ही ४० जागा द्यायला तयार आहोत, त्यांनी याबाबतचा निर्णय कळवावा, अन्यथा आम्ही २८८ जागा लढण्यासाठी सक्षम आहोत असे म्हटले आहे.