मुंबई -भाजपच्या केंद्रात असलेल्या सरकारची परिस्थिती ही कंगाल आणि दारुड्यासारखी झाली असल्याची जळजळीत टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. शासन चालवण्यासाठी 13 लाख कोटींची सरासरी रक्कम लागते, असा अंदाज आहे. नवीन बजेट येईपर्यंत उरलेली रक्कम जमेल काय? अशी शंका असल्याचेही प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.
हेही वाचा... निर्भया प्रकरण: दोषी विनय कुमारने दाखल केली 'क्युरेटीव्ह पिटीशन'
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी देशाच्या आर्थिक परिस्थितीवर बोलताना अनेक प्रश्न उपस्थित केले. प्रशासन चालवण्यासाठी सरकारला पैसे कुठून येणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा... अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी पंतप्रधानांचे अर्थसंकल्पावर वैयक्तिक लक्ष
सीएए आणि एनआरसीला पाठिंबा देणारे मिसकॉल अभियान राबवण्याऐवजी सरकारी तिजोरीतील तूट भरून काढण्यासाठी देणग्यांचे आवाहन करायला हवे होते. मात्र, सरकारने असे केले नाही. अमेरिका-इराण युद्ध सुरू झाले तर त्याचा मोठा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. नोटाबंदी जेव्हा लागू करण्यात आली, त्या दरम्यान एनआरआयना शासनाने पैसे डिपॉझिट करण्यात सूट दिली होती, याद्वारे किती पैसे आले याची माहिती सरकारने दिली पाहिजे, असे आंबेडकर यावेळी म्हणाले