महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'राममंदिर निकाल भावनेच्या आधारावर...अयोध्या हे बौद्ध सांस्कृतिक केंद्र' - prakash ambedkar on ram mandir

अयोध्येच्या निकालावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा निकाल तथ्याचा नव्हे तर भावनेच्या आधारावर देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

राममंदिर निकाल
'राममंदिर निकाल भावनेच्या आधारावर...अयोध्या हे बौद्ध सांस्कृतिक केंद्र'

By

Published : Aug 4, 2020, 1:24 PM IST

Updated : Aug 4, 2020, 3:18 PM IST

मुंबई - अयोध्येच्या निकालावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा निकाल तथ्याचा नव्हे तर भावनेच्या आधारावर देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

प्रकाश आंबेडकर - अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

राहुल सांस्कृत्यायन या इतिहासकारांनी सांगितले की, अयोध्या हे बौद्ध सांस्कृतिक तसेच बौद्धांचे ज्ञानाचे केंद्र होते. अलाहाबाद (प्रयागराज) उच्च न्यायालयात प्रकरण गेले तेव्हा हा निकाल तथ्यांवर नाही तर भावनांवर झाला. परिणामी निकाल राम मंदिराच्या बाजूने लागला. सर्वोच्च न्यायालयातही इतिहासाला व पुराव्यांना ग्राह्य धरले नाही, यातून एक मार्ग काढला जात आहे असे सांगत राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला.

अयोध्येच्या आधी 'साकेत'

अलाहाबाद न्यायालयाने हे मान्य केले असते की अयोध्या ही पूर्वी साकेत नावाने ओळखली जात होती. या ठिकाणी केलेल्या खोदकामात जे सापडले ते बौद्ध अवशेष आहेत. मात्र सध्याची परिस्थिती पाहता राम मंदिर निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही राम मंदिराच्या बाजूने निकाल देतो, असे स्पष्ट न्यायालयाने सांगितले असते, तर भारतीयांकडे ज्या संशयित नजरेने पाहिले जाते, ते दूर झाले असते. कारण भारतीय आता आपल्याशी खरे बोलायला लागले आहे, असा निकाल त्या ठिकाणी लागला असता. मात्र, आताचा निकाल पाहता आजही भारतीयांकडे संशयित नजरेने पाहिले जाईल, असेही शेवटी प्रकाश आंबेडकर म्हणाले.

वैदिक धर्मीयांचे दुसऱ्या धर्मावर अतिक्रमण

जगामध्ये भारतीयांकडे संशयित नजरेने पाहिले जाते. मात्र याबाबत कोणीही भारतीय स्वतःला प्रश्न विचारत नाही, की आमच्यावर अत्याचार झालेले असताना आता जगही आमच्यावर अत्याचार करत आहे. हे सत्य आहे कि वैदिक धर्म मानणारे लोक हे दुसऱ्या धर्मावर अतिक्रमण करत आहेत. जे आता आयोध्येत होत आहे. हे सत्य आजही भारतीय मानायला तयार नाही, असे आंबेडकर म्हणाले.

Last Updated : Aug 4, 2020, 3:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details