महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शिवसेनेने कठीण समयी साथ दिली, त्यामुळे सेनेत प्रवेश - प्रदीप शर्मा - pradip sharma Resignation

एन्काऊंटर फेम प्रदीप शर्मा यांनी पोलीस दलाचा राजीनामा दिला आणि शिवबंधनात अडकले. शिवसेना कठिण काळात आपल्या पाठीशी राहिली, त्यामुळे शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.

सेनेत प्रवेश

By

Published : Sep 14, 2019, 9:47 AM IST

मुंबई- आपल्या पडत्या काळात शिवसेनाच आपल्या पाठीशी ठाम उभी राहिली. त्यामुळे आपली राजकीय कारकीर्द पण याच पक्षातून सुरु करणार अशी घोषणा करत एन्काऊंटर फेम प्रदीप शर्मा यांनी हातात शिवबंधन बांधले. आपण निलंबित असताना आपल्याला फक्त शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर यांनी साथ दिली. ज्यामुळे आपल्याला त्यातून बाहेर पडायला मदत झाली.

शिवसेना कठिण काळात आपल्या पाठीशी राहिली

आपण पोलीस सेवेत असताना देखील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वेळोवेळी कौतुकाची थाप दिली. त्यामुळे आपल्याला कर्तव्य बजावताना उभारी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. सेवेतून निवृत्त होताना अतीव दुःख होत असले तरी राजकीय कारकीर्द सुरु करताना सेना हा एकच पक्ष आपल्याला जवळचा वाटतो असे ते म्हणाले. आजपर्यंत छोटा राजन, दाऊद, लष्कर-ए-तोयबाचे अतिरेकी मारताना आपल्याला कधी भीती वाटली नसल्याचेही ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details