मुंबई स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi ka Amrit Mahotsav) अंतर्गत १३ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणाऱ्या "हर घर तिरंगा" (Har Ghar Tiranga) अभियानाविषयी ठीकठाकाणी जनजागृती केली जात आहे. मुंबई येथीलमहानगरपालिकेच्या (Har Ghar Tiranga Abhiyan in Byculla) भायखळा ई विभाग कार्यालयाच्यावतीने आज एकाचवेळी सात ठिकाणाहून प्रभातफेरी (Prabhat Pheri) काढण्यात आली. सिनेअभिनेत्री डायना पेंटी (Diana Penty) यांच्या उपस्थितीत ही प्रभातफेरी काढण्यात आली.
प्रभातफेरीचे आयोजनबृहन्मुंबई महानरपालिकेच्या ‘ई’ विभाग कार्यालय येथून प्रभातफेरीचे आज आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये स्थानिक पोलिस प्रशासन, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निरनिराळ्या शाळांचे विद्यार्थी आणि महानगरपालिका कर्मचारी इत्यादी सहभागी झाले. या प्रभातफेरीसाठी बॉलिवूड अभिनेत्री डायना पेंटी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. ‘ई’ विभाग परिसरात एकाचवेळी सात वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रभातफेरी निघाली. यानंतर, ‘स्वातंत्र्य लढ्यातील भायखळ्याचे योगदान’ या संकल्पनेवर ई विभाग कार्यालयामार्फत तयार केलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन देखील डायना पेंटी यांच्या हस्ते करण्यात आले.