मुंबई -क्रूझ प्रकरणात पंच प्रभाकर साईल यांनी मोठा गौप्यस्फोट केल्यानंतर ते कुठे आहे? हे जाणून घेण्यासाठी एनसीबीकडून मुंबई पोलिसांना पत्र देण्यात आले आहे. यावर आम्हाल पत्र मिळाले नाही, त्यामुळे यावर अधिक बोलणार नाही. तसेच, आम्हाला पर्सनली किंवा साईल यांच्या घरी एनसीबीने कुठलेही समन्स पाठवलेले नाही, असा दावा साईल यांचे वकील प्रभाकर इंगोले यांनी केला आहे. त्याचबरोबर, साईल यांना किंवा त्यांच्या वकिलांना समन्स पाठवा, आम्ही चौकशीसाठी येऊ, असे पत्राद्वारे कळवल्याचे देखील वकील इंगोले यांनी सांगितले.
हेही वाचा -अजित पवारांनी पत्नी व मुलाच्या नावे बँकेत पैसे वळविले, सोमैयांचा आरोप
प्रभाकर साईल यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात आणावे, अशा प्रकारचे पत्र एनसीबी अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांना दिले होते. मात्र, प्रभाकर साईल यांना कुठलीही नोटीस का देण्यात आली नाही? असा सवाल देखील प्रभाकर साईल यांच्या वकिलाच्या मार्फत विचारण्यात आला आहे. या संदर्भात त्यांनी आज मुंबईतील एनसीबी अधिकारी यांची भेट घेऊन पत्र दिले आहे. एनसीबी प्रभाकर साईल यांना जेव्हा केव्हा चौकशीसाठी बोलवणार तेव्हा ते हजर राहणार, ते फरार नसून मुंबईतच आहे, त्यांना मुंबई पोलिसांनी संरक्षण देखील दिलेले आहे, अशी माहिती प्रभाकर साईल यांचे वकील प्रभाकर इंगोले यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.