महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Power Cut in State cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत बत्ती गुल; मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती - ओबीसी आरक्षण

बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू (State Cabinet Meeting) असताना मंत्रालयात वीजपुरवठा खंडित झाल्याने (Power Cut) ही बैठक आटोपती घ्यावी लागली पाच मिनिटात वीजपुरवठा पुन्हा सुरू झाला असला तरी मुळात वीजपुरवठा खंडित का झाला याची चौकशी सुरू केली आहे.

Power cut
Power cut

By

Published : May 12, 2022, 9:43 AM IST

Updated : May 12, 2022, 10:48 AM IST

मुंबई - बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू (State Cabinet Meeting) असताना मंत्रालयात वीजपुरवठा खंडित झाल्याने (Power Cut) ही बैठक आटोपती घ्यावी लागली पाच मिनिटात वीजपुरवठा पुन्हा सुरू झाला असला तरी मुळात वीजपुरवठा खंडित का झाला याची चौकशी सुरू केली आहे.

मुख्यमंत्र्यांचा ऑनलाईन संपर्क तुटला
बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी ४ वाजता सुरू झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत ऑनलाइन हजेरी लावली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मंत्री मंत्रालयातील ७ व्या मजल्यावरील सभागृहात बैठकीसाठी बसलेले होते. चर्चेअंती एकेक निर्णयास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर ५:३० च्या सुमारास अजित पवार यांनी सर्व अधिकाऱ्यांना बैठकीतून बाहेर जाण्यास सांगितले आणि ओबीसी आरक्षणाबद्दल मंत्र्यांमध्ये चर्चा सुरू झाली. १५-२० मिनिटे झाली असतानाच अचानक वीज गेली. लगेच इन्व्हर्टरवर माइक व यंत्रणा सुरू झाली. पण तोपर्यंत मुख्यमंत्र्यांचा संपर्क तुटला होता. परंतु प्रयत्न करूनही ते पुन्हा प्रस्थापित होऊ शकला नाही म्हणून ही बैठक आटोपती घेण्यात आली.

तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित - बेस्ट
राज्य गेले २० दिवसांपासून भारनियमनमुक्त असताना बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना मंत्रालयात वीज पुरवठा खंडित झाल्याने सर्वत्र धावाधाव सुरू झाली. मंत्रालय परिसराला बेस्ट करून वीज पुरवठा होतो. मंत्रालयातील वीजपुरवठा खंडित झाला याबाबत बेस्टकडे विचारणा केली असता तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडित झाला. पण वीजपुरवठा नेमका कशामुळे खंडित झाला याचा शोध आम्ही घेत आहोत असेच बेस्टच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच उन्हाच्या तडाख्यामुळे विजेची मागणी वाढत असून राज्यात बुधवारी २३ हजार ४०० मेगावॅट एवढी विजेची मागणी नोंदविण्यात आली आणि त्या तुलनेत पुरवठा देखील तेवढाच करण्यात आला अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा -Navneet Rana : 'इतकं घाणेरडं राजकारण फक्त उद्धव ठाकरेच करू शकतात'.. नवनीत राणांचा हल्लाबोल

Last Updated : May 12, 2022, 10:48 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details