महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 10, 2021, 4:05 PM IST

ETV Bharat / city

School Reopening postponed : इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यास स्थगिती, १५ ला निर्णय होणार

महाराष्ट्र शासनाने इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे ( MH Government Postponed the 1 to 7th classes) वर्ग सुरु करण्यासंदर्भात सूचना दिली होती. मात्र मनपा आयुक्तांनी नवीन कोरोना व्हेरीयंटचा (New Corona Variant) धोका लक्षात या वर्गातील शाळा सुरु करण्यावर स्थगिती दिली आहे.

School Reopening
School Reopening

नागपूर -कोरोनाचा नवीन विषाणू ओमायक्रॉनचा (Omicron Variant) प्रादुर्भाव लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेने मनपा क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे (First to Seven Standard) वर्ग सुरु करण्यास पुन्हा १५ डिसेंबर, २०२१ पर्यंत स्थगिती दिली आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी यासंबंधीचे आदेश शुक्रवारी (१० डिसेंबर) रोजी जारी केले आहेत.

शाळा सुरू करण्यास स्थगिती

सध्या कोरोना विषाणुचा नवा प्रकार "ओमायक्रॉन" आढळून आला असून जागतिक आरोग्य संघटनेने सदर विषाणू प्रकारास व्हेरीयंट ऑफ कंर्सनम्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील शाळा सुरू करण्याचे आदेश १५ डिसेंबर नंतर जारी करण्यात येतील. मात्र मनपा क्षेत्रातील इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग पूर्वी प्रमाणेच सुरु राहतील असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

शासनाचा आदेश
ऑनलाइन शाळा सुरू राहणार
महाराष्ट्र शासनाने इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात सूचना दिली होती. मात्र, मनपा आयुक्तांनी नवीन कोरोना व्हेरीयंटचा धोका लक्षात या वर्गातील शाळा सुरु करण्यावर स्थगिती दिली आहे. मनपा आयुक्तांनी हा निर्णय साथरोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये प्राप्त अधिकारानुसार घेतला आहे. शिक्षण विभागा व्दारे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतचे नियमित वर्ग पुढील आदेशापर्यंत पूर्णत: बंद राहतील. मात्र या वर्गाचे ऑनलाईन शिक्षण सुरु राहणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा -Mumbai Mayor Death Threats : मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

ABOUT THE AUTHOR

...view details