मुंबई - मुंबई महापालिकेच्या मालकीच्या बीआयटी चाळीमध्ये ४५ हजार भाडेकरू राहतात. या भाडेकरूंकडून मालमत्ता कर वसूल केला जाणार होता. या मालमत्ता कर वसुलीला स्थायी समितीत सर्व पक्षीयांनी स्थगिती द्यावी, अशी मागणी लावून धरल्याने प्रशासनाने कर वसुली स्थगित करण्याचे मान्य केले. प्रशासनाच्या या निर्णयामुळे भाडेकरूंना दिलासा मिळाला आहे.
सर्व पक्षीय सदस्यांचा तीव्र विरोध
बीआयटी चाळींसह पालिकेने बांधलेल्या व संपादित केलेल्या वसाहतींमधील ४५ हजार ५५८ भाडेकरूंकडून मालमत्ता कर वसूल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. १ एप्रिल २०१७ च्या पूर्वलक्ष्यी प्रभावाने ही कर वसुली करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरु केली होती. याबाबतचे परिपत्रकही प्रशासनाने जाहिर केले. मात्र परिपत्रक जारी करण्यापूर्वी प्रशासनाने स्थायी समितीची परवानगी घेणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष करीत कर वसुलीची भूमिका प्रशासनाने घेतली. या निर्णयाला सर्वपक्षीयांनी तीव्र विरोध केला. मात्र कर वसुली करायची की नाही याबाबत निर्णय करनिर्धारण व संकलक खात्याने घ्यावा, अशी भूमिका प्रशासनाने घेतली होती. त्यामुळे करनिर्धारण व संकलक विभाग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. सोमवारी कर वसुलीबाबत झालेल्या चर्चेदरम्यान सर्व पक्षीय सदस्य़ांनी तीव्र विरोध केला. भाडेकरूंवरील कर वसुलीला स्थगिती द्यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली. याला प्रशासनाने मान्यता दिली आहे.
'भाडेकरूंना मालमत्ता कर भरावा लागेल'