पाणी नियोजनाचे संस्कार गावाला आणि महाराष्ट्राला समृद्ध करतील - मुख्यमंत्री - पाणी फाऊंडेशन
टीमवर्क आणि योजनेबद्दलच्या आपलेपणातून समृद्ध गावांची निर्मिती करणे शक्य असल्याचे सांगत पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून पर्यावरण आणि आर्थिक समृद्धीच्या वाटेवर मार्गस्थ झालेल्या गावांचे, गावकऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कौतुक केले.
मुंबई - जलक्रांती तून हरित क्रांती येणार आहे आणि हरित क्रांती सुबत्ता. पण हे कुणा एकाचे काम नाही, तर ते सर्वांचे एकत्र येऊन करायचे काम आहे. पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची शास्त्रशुद्ध साठवणूक, पाणी वापर, पाणी नियोजन, पीक निर्मिती केंद्र व त्यांचे निर्मिती अशा महत्त्वाच्या विषयांवर संस्कार देण्याचे काम पाणी फाउंडेशनने केले. यातील प्रयोगशीलता समजून घेतली. पाण्याचा जमिनीखालच्या सातबारा कसा मोजायचा, हे समजून सांगितले. शिक्षणाबरोबरच संस्कार महत्त्वाचा असतो. पाणी नियोजनाचा संस्कार गावाला आणि महाराष्ट्राला समृद्ध करणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
२२ मार्च जागतिक जल दिनाच्या व तिथे साधून पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते, गाव स्पर्धेचा गौरव सोहळा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पाडला. राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पाणी फाऊंडेशनचे संस्थापक आमिर खान, किरण राव, मुख्य कार्यकारी अधिकारी या कार्यक्रमात ऑनलाईन झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्वसामान्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्मिती केली. त्याच सुराज्यात रूपांतर करताना वसंत कानेटकर यांनी म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा गावाला भाले फुटण्याची गरज असल्याचे, मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. यातून अडचणीवर मात करत समृद्धी पाणीदार गावाच्या निर्मितीसाठी आपल्याला कळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सोप्या भाषेत ज्ञान
पावसाचे वाहून जाणारे पाणी धरणे, कालवे या माध्यमातून साठवताना त्याचा नियोजनबद्ध वापर होणे गरजेचे असते. यासाठी माथ्यापासून पायथ्यापर्यंत नाहीतर मुळापर्यंत जाऊन तयारी करायची लागते, ती तयारी पाणी फाउंडेशनने केली. गावकऱ्यांना सोबत घेऊन सोप्या भाषेत त्यांच्यापर्यंत यासंबंधीचे ज्ञान पोहोचवण्याचे काम केल्याचे प्रसंग व उद्गार मुख्यमंत्री काढले.
त्रिसूत्रीचे पालन करा -
कोरोनाने पुन्हा एकदा खूप मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे. गावा गावात स्थापन करण्यात आलेल्या दक्षता समितीनी दक्षता घ्यावी. शारीरिक अंतर राखणे, मास्क लावणे, स्वच्छता राखणे यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींवर काम करावे. गावात कोणीही मास्क न लावता फिरत असेल तर त्याला मास्क लावण्यास सांगावे. त्रिसूत्री पालन करायला लावण्याची शिस्त लावावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
गावाच्या विकासासाठी एकत्रित काम करू
शास्त्रशुद्ध नियोजनामुळे समृद्ध गाव स्पर्धा यशस्वी होईल. देशातील शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद व्हावा. शेतकरी चिंतामुक्त व्हावा, यासाठी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात विकेल ते पिकेल योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. समृद्ध गाव योजनेत सहभागी गावांमध्ये कृषी विभागाच्या योजनांची बळ देऊन आपण गावांच्या विकासासाठी एकत्रित काम करू, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले. कृषी विभागाच्या महत्वकांक्षी योजनांची यावेळी माहिती दिली.
महाराष्ट्रातील ६० टक्के भाग जिरायती
महाराष्ट्रातील ६० टक्के जिरायती असून तेथे पाणलोटाचे काम केल्याशिवाय पर्याय नाही. पाणी फाउंडेशनने खूप महत्त्वाचे काम केले. शासनही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून शेतीचा ऱ्हास थांबवण्यासाठी शेतात पाणी साठवणीसाठी प्रचंड काम करण्याची गरज आहे, असे मत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी व्यक्त केले.
९०० गावात पाणी साठवण्याचे काम
पाणी तर महाराष्ट्राचे स्वप्न उराशी बाळगून पाच वर्षांपूर्वी पाणी फाउंडेशन महाराष्ट्रात काम सुरू केले. आता या कामाचा अधिक गावात विस्तार न करता काही निवडक गावांमध्ये खोलवर जाऊन गाव समृद्धीचे काम करण्यात येत आहे, असे अभिनेता आणि संस्थेचे संस्थापक आमिर खान यांनी सांगितले. तसेच फाउंडेशन सध्या ९०० गावात पाणी साठवणचे काम करत आहे, असेही ते म्हणाले.
सहा विषयांवर लक्ष गेले
जलसंधारण जलव्यवस्थापन, मातीचे संवर्धन, पोस्ट गवत संवर्धन, वृक्षलागवड आणि प्रत्येक शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत वाढवणे, या सहा मुद्द्यांच्या उद्दिष्टांवर पाणी फाउंडेशन काम करत आहे, अशी माहिती किरण राव, डॉ. अविनाश पोळ यांनी दिली. लोकचवळीतील अनुभव यावेळी कथन केले.