मुंबई - शिवसेना-भाजपमधील संघर्ष चिघळत असून आता ट्विटर वॉर रंगले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी खुर्चीवर बसलेले बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन उभे असलेले कार्टून ट्विट करत कोण कोणामुळे वाढले, (Poonam Mahajan's Twitter) 'उघडा डोळे बघा नीट' या मथळ्याखाली प्रसिद्ध केले आहे. (BJP Shiv Sena Hindutva) दरम्यान, यावरप्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांनी तिखट भाषेत प्रतिक्रिया दिली आहे. (CM Uddhav Thackeray) 'दोन्ही मर्दानी हिंदुत्वसाठी युती केली होती, नामर्दासारखे कार्टून दाखवू नका, अशा शब्दात राऊत यांचा समाचार घेतला आहे. त्यामुळे हा वाद आता चांगलाच चिघळला आहे.
हा वाद शांत होत असतानाच संध्याकाळी राऊत यांच्या नव्या ट्विटने या वादाला हवा मिळाली
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना, भाजपसोबतची पंचवीस वर्षाची युती सडली, असा हल्लाबोल केला. (Anniversary of Balasaheb Thackeray) यामध्ये भाजपवर हिंदुत्वावरून हल्ला केला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील भाजपच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवले. त्यानंतर पत्रकार परिषद घेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. (Devendra Fadnavis on Uddhav Thackeray ) सेना नेते संजय राऊत यांनी या आरोपांचे खंडन करताना भाजपच्या हिंदुत्वाचा समाचार घेतला. विस्मरण झालेल्या भाजपला शिवसेनेच्या इतिहासाची माहिती करून देण्यासाठी शिबिर भरणार असल्याचे स्पष्ट केले. हा वाद शांत होत असतानाच संध्याकाळी राऊत यांच्या नव्या ट्विटने या वादाला हवा मिळाली आहे.